30 C
Mumbai
Tuesday, October 6, 2026
घरक्राईमनामातोंडावर मुक्का मारल्याने पतीचा मृत्यू!

तोंडावर मुक्का मारल्याने पतीचा मृत्यू!

दुबईला घेऊन जात नसल्याने होती नाराज

Google News Follow

Related

एका महिलेने आपल्या पतीच्या तोंडावर जोरदार मुक्का मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली. तिच्या वाढदिवसानिमित्त तिला दुबईत न नेल्याने ती पतीवर नाराज होती. ही घटना शुक्रवारी दुपारी वानवडी परिसरात घडली. यात मृत्यू झालेल्या पतीचे नाव निखिल खन्ना असून तो एक बांधकाम व्यावसायिक होता.

‘मृताची पत्नी रेणुका (३६) हिचा १८ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. तिचा वाढदिवस दुबईमध्ये साजरा करण्याची तिची इच्छा होती. मात्र तिच्या पतीने त्यांची मागणी पूर्ण केली नाही. त्यानंतर ५ सप्टेंबरला त्यांच्या लग्नाचा वाढदिवसही होता. या दिवसानिमित्त तिला पतीकडून चांगली भेट हवी होती. त्याशिवाय, तिच्या एका नातेवाइकाचा वाढदिवसही होता. त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तिला दिल्लीला जायचे होते.

हे ही वाचा:

पाकिस्तानमध्ये पुन्हा एक हिंदू मंदिर उद्ध्वस्त!

अंतरावालीत पिस्तुलासह अटक झालेला ऋषीकेश बेदरे कोण?

शालेय आहारात अंडी कशाला? शाकाहारच हवा!

‘दुष्ट आत्म्यापासून मुक्ती मिळेल’ परंतु त्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल!

मात्र तिच्या पतीने तिची ही इच्छाही पूर्ण केली नाही. यावरूनच दोघा दाम्पत्यांमध्ये शुक्रवारी जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात पत्नीने पतीच्या नाकावर जोरदार मुक्का मारला. त्यामुळे त्याच्या नाकातून जोरदार रक्त वाहू लागले आणि तो बेशुद्ध पडला. शेजाऱ्यांनी ही बाब पोलिसांना कळवताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी खन्ना याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचाराआधीच मृत घोषित केले.

महिलेने दुसऱ्या कुठल्या हत्याराने तर पतीवर वार केला नाही ना, याचा तपास पोलिस करत आहेत. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी महिलेविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा