33 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
घरविशेषअमेरिकेतील एफबीआयची स्पेशल एजंट आहे भारतीय वंशाची महिला!

अमेरिकेतील एफबीआयची स्पेशल एजंट आहे भारतीय वंशाची महिला!

एफबीआयमध्ये रुजू होण्याआधी त्या डॉक्टरही होत्या

Google News Follow

Related

अमेरिकेची गुप्तचर संघटना असणाऱ्या एफबीआयची महिला एजंट सध्या चर्चेत आहे. ही महिला भारतीय वंशाची पहिली अमेरिकी नागरिक आहे, जिची नियुक्ती एफबीआयची स्पेशल एजंट म्हणून करण्यात आली आहे.

एफबीआयच्या या स्पेशल एजंटचे नाव शोहिनी सिन्हा आहे. त्यांची याच वर्षी ऑगस्ट महिन्यात स्पेशल एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या दहशतवाद्यांशी संबंधित प्रकरणे सोडवण्यात कुशल आहेत. सद्यस्थितीत अमेरिकेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास त्या करत आहेत. अनेक हाय प्रोफाइल प्रकरणांचा तपास त्या करत असल्याने त्यांचे नाव सध्या चर्चेत आहे.त्यांनी याआधी वॉशिंग्टन डीसीतील एफबीआय मुख्यालयात कार्यकारी विशेष सहाय्यक म्हणून काम केले आहे. त्यांनी कॅनेडियन माऊंटेड पोलिस आणि कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिसोबत दहशतवादविरोधी प्रकरणांवर काम केले आहे.

हे ही वाचा:

‘दुष्ट आत्म्यापासून मुक्ती मिळेल’ परंतु त्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल!

ट्रॉफीवर पाय ठेवल्याने मार्शवर शामीची टीका!

तोंडावर मुक्का मारल्याने पतीचा मृत्यू!

पाकिस्तानमध्ये पुन्हा एक हिंदू मंदिर उद्ध्वस्त!

कोण आहेत शोहिनी?
शोहिनी या सन २००१मध्ये एफबीआयमध्ये रुजू झाल्या होत्या. त्यांची पहिल्यांदा मिल्वौकी फिल्ड ऑफिसमध्ये नियुक्ती केली होती. तिथे त्यांच्यावर दहशतवादी प्रकरणे सोडवण्याची जबाबदारी दिली होती. त्यांनी ग्वांतानामो बे नेवल बेस, लंडनमधील एफबीआयचे कार्यालय आणि बगदाद ऑपरेशन सेंटरमध्ये काम केले आहे. सन २००९मध्ये त्यांना सुपरव्हायजर स्पेशल एजंट म्हणून पदोन्नती देण्यात आली होती आणि त्यांची बदली वॉशिंग्टन डीसीमध्ये दहशतवादविरोधी पथकात करण्यात आली होती.

त्यानंतर सन २०१२मध्ये पुन्हा पदोन्नती देऊन त्यांना कॅनडातील ओट्टावा येथे पाठवण्यात आले. त्यांनी रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिस आणि कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिससोबत काम केले आहे. शोहिनी यांना सन २०१५मध्ये डेट्रॉइट फिल्ड ऑफिसमध्ये फिल्ड सुपरव्हायझर म्हणून तैनात केले होते. या दरम्यान त्या अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी प्रकरणांचा तपास करत आहेत. एफबीआयमध्ये रुजू होण्याआधी त्या डॉक्टरही होत्या. त्यांनी एका क्लिनिकमध्ये प्रशासक म्हणूनही काम केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
152,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा