24 C
Mumbai
Tuesday, December 23, 2025
घरविशेषरविचंद्रन अश्विन धर्मशाला येथे १००व्या कसोटीसाठी सज्ज

रविचंद्रन अश्विन धर्मशाला येथे १००व्या कसोटीसाठी सज्ज

इंग्लंडविरुद्धचा सामना ७ मार्चपासून खेळवला जाणार

Google News Follow

Related

रविचंद्रन अश्विनने बराच काळ भारतीय संघाचा मुख्य फिरकीपटू म्हणून भूमिका बजावली आहे. आता प्रदीर्घ प्रवासानंतर अश्विन आपला १०० वा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धरमशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना अश्विनच्या कारकिर्दीतील १००वा कसोटी सामना असणार आहे.

इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी अश्विनने ९५ कसोटी सामने खेळले होते. आता चार सामन्यांनंतर त्याने ९९ कसोटी सामने खेळले आहेत. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेपूर्वी अश्विनच्या नावावर ४९० कसोटी विकेट्स होत्या, पण मालिकेत त्याने ५०० बळींचा टप्पा गाठला आहे. भारताकडून तो ५०० कसोटी विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. चार सामन्यांनंतर अश्विन मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ४ सामन्यात ३०.४१ च्या सरासरीने १७ विकेट्स घेतल्या आहेत.

प्रथम श्रेणी क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेटमध्ये खूप मदत झाल्याचे त्याने म्हटले आहे. आयपीएल आणि पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमुळे कसोटीतमध्ये मदत झाली असेही वाटत नसल्याचे अश्विनने म्हटले आहे.

हेही वाचा :

पंतप्रधान मोदींच्या मशालीने मुस्लिमांमध्ये पसरलेला अंधार दूर करेन!

आपल्या सहकाऱ्याचे पैसे चोरून पाकिस्तानी बॉक्सर पळाला!

कारागृहातील कैद्यांवर दहशतवाद्यांची नजर, ब्रेनवॉशचा प्रयत्न!

कारागृहातील कैद्यांवर दहशतवाद्यांची नजर, ब्रेनवॉशचा प्रयत्न!

आत्तापर्यंतची कसोटी कारकीर्द
नोव्हेंबर २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्लीत कसोटी पदार्पण करणाऱ्या रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत ९९ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने १८७ डावात गोलंदाजी करत २३.९१ च्या सरासरीने ५०७ विकेट्स घेतल्या आहेत. गोलंदाजी करून त्यांनी वेळेप्रसंगी उत्कृष्ट फलंदाजीही केली आहे. १४० डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने २६.४७ च्या सरासरीने ३३०९ धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याने ५ शतके आणि १४ अर्धशतके झळकावली आहेत. ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या १२४ धावा आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा