32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरविशेषकारागृहातील कैद्यांवर दहशतवाद्यांची नजर, ब्रेनवॉशचा प्रयत्न!

कारागृहातील कैद्यांवर दहशतवाद्यांची नजर, ब्रेनवॉशचा प्रयत्न!

एनआयएने ७ राज्यांमध्ये छापे

Google News Follow

Related

कर्नाटकच्या तुरुंगातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे.तुरुंगात कैद असणाऱ्या कैद्यांचे ब्रेनवॉश करू त्यांना कट्टरतावादी बनवले जात असल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेला मिळाली आहे.मिळालेल्या माहितीच्या आधारे एनआयए मंगळवारी पहाटे ७ राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकले.तसेच एनआयएच्या अधिकाऱ्यांची १७ ठिकाणी शोध मोहीम सुरु आहे.

एनआयएच्या आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, बेंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद असलेला लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी टी नाझीर हिंसक कारवाया करण्यासाठी कैद्यांना कट्टरपंथी बनवण्याचे काम करत होता.बेंगळुरू शहर पोलिसांनी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये सात पिस्तूल, चार हातबॉम्ब, एक मॅगझिन, ४५ जिवंत राउंड आणि चार वॉकी-टॉकी जप्त केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा:

रणजी ट्रॉफी: मुंबईची तामिळनाडू संघावर मात, फायनलमध्ये धडक!

पंतप्रधान मोदींच्या मशालीने मुस्लिमांमध्ये पसरलेला अंधार दूर करेन!

तृणमूल काँग्रेस आमदाराने राम मंदिराबद्दल ओकली गरळ; अपवित्र स्थान म्हणत हिणवले

पंतप्रधान मोदींने केलं पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचे अभिनंदन!

एनआयएच्या पथकांनी यापूर्वी मोहम्मद उमर, मोहम्मद फैसल रब्बानी, तन्वीर अहमद आणि मोहम्मद फारूक तसेच फरारी जुनैद यांच्या ठिकाणांवर छापे टाकून अनेक डिजिटल उपकरणे, गुन्ह्यातील कागदपत्रे आणि रोख ७.३ लाख रुपये जप्त केले होते.एजन्सीच्या प्रवक्त्याने यापूर्वी खुलासा केला होता की, उमर, रब्बानी, अहमद, फारूक आणि जुनैद हे लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असून ते सर्व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या टी नाझीरच्या संपर्कात होते.

मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यानंतर या पाच जणांनी नाझीर सूचनेनुसार दहशतवादी कृत्ये करण्याचा कट रचला होता, असे प्रवक्त्याने सांगितले.दरम्यान, हे छापे बेंगळुरू बॉम्बस्फोटाच्या तपासाच्या संदर्भात महत्त्वाचे मानले जात आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा