28 C
Mumbai
Wednesday, September 18, 2024
घरविशेषरणजी ट्रॉफी: मुंबईची तामिळनाडू संघावर मात, फायनलमध्ये धडक!

रणजी ट्रॉफी: मुंबईची तामिळनाडू संघावर मात, फायनलमध्ये धडक!

शार्दूल ठाकूरला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित

Google News Follow

Related

४१ वेळा रणजी चॅम्पियन ठरलेला मुंबईचा संघ पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहोचला आहे.रणजी ट्रॉफी-२०२४ मध्ये मुंबई विरुद्ध तामिळनाडू यांच्यात सेमी फायनलचा सामना पार पडला.या सामन्यात मुंबईच्या संघाने तामिळनाडूवर दणदणीत विजय मिळवत ४८व्यांदा रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.

मुंबईच्या बीकेसीमधील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या स्टेडियमवर मुंबई विरुद्ध तामिळनाडू यांच्यात सेमी फायनल सामना पार पडला. पहिल्या डावात तामिळनाडूच्या संघाने फलंदाजी करताना १४६ धावा केल्या.यानंतर मुंबईचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. तामिळनाडूचे गोलंदाज मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पाडत असताना शार्दूल ठाकूर हा मुंबईचा संकटमोचक ठरला.शार्दूल ठाकूरने रविवारी १०९ धावांची कामगिरी केली तर तनुष कोटियनने ८९ धावांची कामगिरी केली.

हे ही वाचा:

विभागीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत आलोक, दुर्वाला सुवर्ण

भाजपाने चंदीगड उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली

बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोटाचा तपास एनआयएकडे!

नफे सिंग राठी हत्या प्रकरणी गोव्यातून दोन शूटर्सना अटक!

शार्दूल आणि तनुष यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे मुंबईच्या संघाने ३७८ चा आकडा गाठला. मुंबईची आघाडी मोडण्यासाठी तामिळनाडूचा संघ दुसऱ्या दिवशी मैदानात उतरला. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांसमोर त्यांचे फलंदाज नरम पडत अवघ्या १६२ धावत तामिळनाडूच्या टीमने आपली गाशा गुंडाळला. यामुळे मुंबईचा एक डाव आणि ७० धावांनी विजय झाला. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी शार्दूल ठाकूरला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, रणजी ट्रॉफीचा दुसरा सेमी फायनल सामना हा विदर्भ विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ मुंबई सोबत फायनल सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा