27.1 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरविशेषहेमंत सोरेन यांच्या वहिनी सीता सोरेन भाजपात!

हेमंत सोरेन यांच्या वहिनी सीता सोरेन भाजपात!

पंतप्रधान मोदींचे विचार अन कामे पाहून भाजपात येण्याची सर्वांची इच्छा, सीता सोरेन

Google News Follow

झारखंडमध्ये मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे.झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वहिनी आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या(जेएमएम) आमदार सीता सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.सीता सोरेन यांनी जेएमएम पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

भाजप झारखंडचे प्रभारी आणि राज्यसभा खासदार लक्ष्मीकांत वाजपेयी आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सीता सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चंपाई सोरेन सरकारमध्ये मंत्री पद न मिळाल्यामुळे सीता सोरेन संतापल्या होत्या.सीता सोरेन या जेएमएम पक्षाचे प्रमुख शिबू सोरेन यांची मोठी सून आणि दिवंगत दुर्गा सोरेन यांच्या पत्नी आहेत.झामुमोच्या तिकिटावर त्या तीन वेळा आमदार झाल्या आहेत.

हे ही वाचा:

चकमक फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला जन्मठेप

सर्फराज, ध्रुव जुरेलची कोटी उड्डाणे

टक्केवारीवाले यजमान चोरांचे स्नेहसंमेलन…

गरिबांचे धर्मांतर करण्याचा गाझियाबादमध्ये प्रकार

 

भाजपमध्ये सामील होण्याच्या काही तास आधी सीता सोरेन यांनी जेएमएम पक्ष सोडला आणि लक्ष्मीकांत वाजपेयी, सचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.सीता सोरेन म्हणाल्या की, आज मी एका विशाल कुटुंबात सामील होत आहे.पंतप्रधान मोदींचे विचार आणि देशाची वाढती प्रगती हे देशातील लोक बघत आहेत.

आज प्रत्येकाला या कुटुंबात सामील व्हायचे आहे.मी अनेक वर्षे झारखंड मध्ये संघर्ष केले आहे.१४ वर्ष झारखंड मुक्ती मोर्चामध्ये माझा सहभाग राहिला.माझे सासरे शिबू सोरेन आणि माझे पती दुर्गा सोरेन यांच्या नेतृत्वात वेगळे राज्य निर्माण केले.त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी मी आमदार झाले.मात्र, जे उद्दिष्ट गाठायचे होते ते साध्य झाले नाही.झारखंड अजूनही विकासापासून दूर आहे.झारखंडला वाचवायचे आहे अन त्यासाठीच मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे सीता सोरेन म्हणाल्या.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा