24 C
Mumbai
Thursday, December 18, 2025
घरक्राईमनामारामनवमीच्या दिवशी ‘जय श्री रामा’चा नारा दिल्याने बेंगळुरूमध्ये तीन जणांवर प्राणघातक हल्ला

रामनवमीच्या दिवशी ‘जय श्री रामा’चा नारा दिल्याने बेंगळुरूमध्ये तीन जणांवर प्राणघातक हल्ला

Google News Follow

Related

‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याने गाडीमधून प्रवास करणाऱ्या तीन जणांना मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी बेंगळुरूमध्ये घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तीन आरोपींना अटक केली.

रामनवमीनिमित्त झेंडा घेऊन ‘जय श्री रामा’चा नारा देत तिघेजण गाडीमधून जात असताना चिक्कबेटहल्ली परिसरात ही घटना घडली. घोषणाबाजीला आक्षेप घेणाऱ्या दोन दुचाकीस्वारांनी त्यांना अडवले. व्हिडीओमध्ये दुचाकीस्वार हे ‘जय श्री राम’च्या घोषणा देणाऱ्यांना इशारा देताना दिसत आहेत आणि त्याऐवजी त्यांना ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास सांगत आहेत.
शाब्दिक वादाचे रूपांतर लगेचच हाणामारीत झाले. दुचाकीस्वार आणि काही स्थानिकांनी गाडीमधील प्रवाशांना मारहाण केली. हल्ल्यादरम्यान तिघांपैकी एकाच्या डोक्यावर काठीने वार करण्यात आले, तर दुसऱ्याच्या नाकाला दुखापत झाली, असे पोलिसांनी सांगितले.

‘तीन तरुणांनी झेंडा हातात धरून गाडीमधून ‘जय श्री रामा’चा जयघोष केला. त्यादरम्यान दोन तरुणांनी गाडी अडवली आणि या नारेबाजीबद्दल त्यांना विचारणा केली, तसेच, ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास सांगतिले. नंतर दुचाकीस्वारांनी गाडीमधील प्रवाशांवर हल्ला करण्यासाठी आणखी तरुणांना आणण्यासाठी तेथून पळाले आणि त्या भांडणात एका व्यक्तीने त्याच्या नाकाला दुखापत केली,’ असे बंगळुरू शहराचे उपायुक्त बीएम लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितले.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांकडून बिहारी कामगाराची गोळ्या झाडून हत्या

बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत हाणामारी; अनेक जखमी

२०१४ मध्ये आशा, २०१९ मध्ये विश्वास अन २०२४ मध्ये मोदींची ‘गँरंटी’

अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर कारची ट्रकला धडक, १० जण ठार!

या प्रकरणी विद्यारण्यपुरा पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम २९५, २९८, ३२४, ३२६, ५०६ अन्वये आणि दंगल प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे प्रसाद यांनी सांगितले. या घटनेत सहभागी असलेल्या पाचपैकी तिघांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. उर्वरित दोघांना लवकरच अटक करू, असे प्रसाद म्हणाले. फरमान आणि समीर अशी दोन आरोपींची नावे आहेत. उर्वरित तिघे अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा