29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
घरविशेषअहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर कारची ट्रकला धडक, १० जण ठार!

अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर कारची ट्रकला धडक, १० जण ठार!

पोलिसांकडून तपास सुरु

Google News Follow

Related

गुजरातमधील नडियादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली.अहमदाबाद-वडोदरा द्रुतगती मार्गावर नडियादजवळ एका कारने एका ट्रेलर ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला.या अपघातात कारमधील सर्व १० जणांचा मृत्यू झाला आहे.घटनास्थळी कारमधील ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.तसेच आणखी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अपघाताची माहिती मिळताच दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. एक्सप्रेस हायवे पेट्रोलिंग टीमही घटनास्थळी पोहोचली आणि कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. या घटनेनंतर एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. हा अपघात का झाला, त्याचे कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गाडीचे ब्रेक निकामी झाले होते की ड्रायव्हर झोपला होता?, याचा तपास पोलीस करत आहेत.मृतदेह शवविच्छेदनासाठी सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.

हे ही वाचा.. 

राहुल गांधी अन प्रियंका हे ‘अमूल बेबीज’!

जॉस बटलरच्या वादळात केकेआर गारद!

युपीएससी परीक्षेत बॅडमिंटनपटू कुहू गर्गने मारले मैदान 

टी-२० विश्वचषकात रोहित-विराट करणार सलामीला

दरम्यान, ट्रेलर रस्त्यावर उभा होता किंवा ट्रेलर रस्त्यावरून जात असताना कारणे मागून ट्रेलरला धडक दिली, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.ही कार वडोदराहून अहमदाबादला जात असताना हा अपघात झाला.या अपघातात कारमधील सर्व १० जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा