25 C
Mumbai
Monday, December 22, 2025
घरक्राईमनामाट्रकच्या धडकेत गाडी उलटी आणि बाहेर पडले सात कोटी!

ट्रकच्या धडकेत गाडी उलटी आणि बाहेर पडले सात कोटी!

आंध्र प्रदेशमधील घटना; पोलिसांकडून कारवाई सुरू

Google News Follow

Related

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच सुरक्षा यंत्रणा आणि निवडणूक आयोग डोळ्यात तेल घालून नाकाबंदी करून रोकड जप्त करण्याचे कामही करत आहे. अशातच मध्ये प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात सात बॉक्समध्ये ठेवलेली ७ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका अपघातामुळे संबंधित वाहनात रोकड असल्याचे समोर आले आहे.

नल्लाजरला मंडलातील अनंतपल्ली येथे एका ट्रकने धडक दिल्यानंतर छोटा हाती (छोटा टेम्पो) पलटी झाला. त्यानंतर या गाडीमधून रोकड असलेले सात कार्डबोर्डचे बॉक्स नेले जात असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले आणि त्यांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. ही गाडी विजयवाडाहून विशाखापट्टणमच्या दिशेने जात होती. पलटी झालेल्या गाडीचा चालक जखमी असून त्याला उपचारासाठी गोपालपुरम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातील एका चेकपोस्टवर ट्रकमधून 8 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली होती. रोकड जप्त केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही रोकड पाईपने भरलेल्या ट्रकच्या एका गुप्त डब्यात लपवून ठेवली होती. आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्याच्या गरिकापाडू चेकपोस्ट येथे हे प्रकरण उघडकीस आले. एनटीआर जिल्हा पोलिसांनी चेक पोस्टवर ८ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. पाईपने भरलेल्या लॉरीच्या वेगळ्या केबिनमध्ये हे पैसे सापडले. पोलिसांनी रोख रकमेसह दोघांना ताब्यात घेतले आहे. हे पैसे हैदराबादहून गुंटूरला नेले जात होते.

हे ही वाचा:

“काँग्रेस आपल्याच देशाला घाबरवण्याचा प्रयत्न करतेय”

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकविरोधी निदर्शनात फडकला तिरंगा

२५ गोळ्या मारून पाकिस्तनाचे ड्रोन बीएसएफने पळवून लावले!

लव्ह जिहादचे प्रकरण; हिंदू असल्याची बतावणी करून २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार

सध्या देशभरात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुका सात टप्प्यात होणार असून, याचे तीन टप्पे यशस्वी पार पडले आहेत. आंध्र प्रदेशात यंदा लोकसभा निवडणुकांसह विधानसभेच्या निवडणुकाही एकत्र होणार आहेत. त्यामुळे येथे जास्त राजकीय हालचाली आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा