30 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरक्राईमनामाख्रिसमसच्या पूर्वसंध्‍येला बांगलादेशच्या चितगावमध्‍ये ख्रिश्चन समुदायाची १७ घरे जाळली

ख्रिसमसच्या पूर्वसंध्‍येला बांगलादेशच्या चितगावमध्‍ये ख्रिश्चन समुदायाची १७ घरे जाळली

वस्तीमधील लोक जवळच्या चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेलेले असताना केले लक्ष्य

Google News Follow

Related

बांगलादेशमध्ये सत्तापालट होताच तेथील अल्पसंख्यांक समुदायावर वारंवार अत्याचार होत असल्याच्या घटना घडत आहेत. हिंदुंवर सातत्याने हल्ले होत असून मंदिरांनाही लक्ष्य केले जात आहे. अशातच आता ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य करण्यात आल्याची घटना बांगलादेशमधून समोर आली आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्‍येला बंदरबन जिल्‍ह्यातील चितगावमध्‍ये धर्मांधांनी ख्रिश्चन समुदायाची काही घरे जाळल्याची घटना घडली आहे.

बंदरबन जिल्‍ह्यातील चितगावमध्‍ये ख्रिसमसच्या निमित्ताने लोक जवळच्या चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेले होते. यावेळी ख्रिश्चन समुदायाची १७ हून अधिक घरे जाळण्यात आली. या दुर्दैवी घटनेत त्यांचे १५ लाखांहून अधिक रुपयांचे (बांगलादेशी चलन) नुकसान झाल्याचे ख्रिश्चन समुदायाने म्‍हटले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी बुधवारी दुपारपर्यंत जाळपोळप्रकरणी कोणतीही औपचारिक तक्रार नोंदवण्यात आली नव्हती, मात्र तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

बंदरबन येथील लामा सरायच्या एसपी गार्डनमध्ये त्रिपुरातील १९ ख्रिस्‍ती सुमदायाची कुटुंबे वास्‍तव्‍यास होती. ही बाग शेख हसीना सरकारमधील वरिष्ठ अधिकारी बेनझीर अहमद यांची आहे. ते एसपी गार्डन म्हणून ओळखले जाते. ५ ऑगस्टनंतर बेनझीर अहमद आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हा परिसर सोडला. यानंतर त्रिपुरा समाजातील १९ कुटुंबे येथे वास्‍तव्‍यास आहेत. मंगळवारी सायंकाळी नाताळच्‍या पूर्वसंध्‍येला सर्वजण शेजारच्या चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी गेले होते. यावेळी परिसरात कोणीच नव्‍हते याचा फायदा घेत १७ घरे पेटवून देण्‍यात आली.

हे ही वाचा : 

भाजपाला गतवर्षी पेक्षा तीनपट अधिक धनलाभ! २,२४४ कोटी रूपयांच्या देणग्या

कल्याण:अल्पवयीन मुलीवर अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी!

ख्रिसमससाठी सांताक्लॉज बनून डिलीव्हरी करता तर, हिंदू सणांच्यावेळी भगव्या रंगाचा पोशाख घालून जाता का?

सुप्रिया सुळे म्हणतात, मी यापूर्वी चार निवडणुका ईव्हीएमवर जिंकल्या

पीडितांनी सांगितले की, त्यांना १७ नोव्हेंबरपासून परिसर रिकामा करण्यास सांगितले जात आहे. येथे राहण्यासाठी त्यांच्याकडून मोठ्या रकमेची मागणी केली जात आहे. या प्रकरणी १५ जणांविरोधात पोलिसात तक्रारही केली होती; परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. मात्र, आता आगीत घरे भस्म झाल्याने ख्रिस्‍ती बांधवांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा