23 C
Mumbai
Monday, December 22, 2025
घरदेश दुनियासुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीसाठी ट्रम्प यांनी स्पेसएक्सकडे मागितली मदत

सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीसाठी ट्रम्प यांनी स्पेसएक्सकडे मागितली मदत

बायडन सरकारवर ओढले ताशेरे

Google News Follow

Related

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचा साथीदार बुच विल्मोर हे गेल्या सात महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अडकून पडले असून त्यांचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग शोधत आहेत. अखेर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर भाष्य केले असून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या साथीदाराच्या पृथ्वीवर परतण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. सुनीता विल्यम्स यांना परत आणण्यासाठी ट्रम्प यांनी उद्योगपती एलोन मस्क यांच्याकडे मदत मागितली आहे. तसेच त्यांनी याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बायडन प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.

स्पेस एजन्सी ‘स्पेस एक्स’चे मालक एलोन मस्क यांनी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यास सांगितले आहे. हे दोन्ही अंतराळवीर गेल्या वर्षी जूनपासून अवकाशात अडकले होते. एलोन मस्क म्हणाले की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेस एक्सला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर अडकलेल्या दोन अंतराळवीरांना लवकरात लवकर घरी आणण्यास सांगितले आहे. आम्ही ते लवकरच करू. त्यांनी बायडन सरकारवर टीका करत म्हटले आहे की, हे दुःखद आहे की बायडन प्रशासनाने त्यांना इतके दिवस तेथे सोडले. ट्रम्प यांनी मंगळवारी असेही सांगितले की स्पेसएक्स लवकरच दोन अमेरिकन अंतराळवीरांना परत आणण्यासाठी एक मोहीम सुरू करेल.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे गेल्या वर्षी ५ जून रोजी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले होते, परंतु बोईंग अंतराळ यानाला तांत्रिक समस्या आल्या आणि दोन्ही अंतराळवीर तिथेच अडकले. सुनीता विल्यम्स या स्पेस स्टेशनमध्ये फक्त १० दिवस थांबणार होत्या, पण गेल्या आठ महिन्यांपासून त्या तिथेच अडकल्या आहेत. नासाकडून या अंतराळ यानाचे निराकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु हे यान शास्त्रज्ञांसह पृथ्वीवर आणणे खूप धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातून सहा रॉकेट्स जप्त

निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप करणाऱ्या कॅनडाला भारताने सुनावले

झारखंडमध्ये सुरक्षा दल, नक्षलवाद्यांमध्ये चकमक; एकाचा मृतदेह सापडला

इस्रोची शतकी झेप!

ऑगस्ट २०२४ मध्ये, नासाने सांगितले की, त्यांनी अंतराळवीरांना परत आणण्यासाठी एलोन मस्क यांची कंपनी स्पेस एक्सशी चर्चा केली आहे. त्यांना Crew-9 कॅप्सूलमधून पृथ्वीवर आणण्यास सांगितले आहे. अद्याप तारीख जाहीर झाली नसली तरी मार्च किंवा एप्रिलमध्ये दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परत येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा