28 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरस्पोर्ट्सपाचव्या पराभवानंतर धोनीचा पारा चढला!

पाचव्या पराभवानंतर धोनीचा पारा चढला!

Google News Follow

Related


आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात सलग पाचव्या पराभवाचा सामना केल्यानंतर माजी कर्णधार एम. एस. धोनीने संघाच्या फलंदाजीवर थेट सवाल उपस्थित केला.

चेपॉकच्या घरच्या मैदानावरच चेन्नईचा डाव फक्त १०३ धावांत ९ गडी बाद झाला. ही केवळ चेपॉकवरील सर्वात कमी धावसंख्या नसून, IPL मधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या आहे.

कोलकाताकडून सुनील नारायणने १३ धावांत ३ विकेट्स, तर हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी २ गडी बाद करत चेन्नईच्या फलंदाजीची वाट लावली.

जवाबात नारायणने १८ चेंडूत ४४ धावा करत सामना केवळ ५९ चेंडू शिल्लक ठेवून संपवला आणि CSK ला ८ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. नारायणला त्यांच्या अष्टपैलू कामगिरीसाठी प्लेयर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं.


धोनी म्हणतो – “विकेट्स लवकर गेल्या, भागीदारीच जमली नाही”

सामन्यानंतर धोनीने स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त करताना सांगितलं की,

आज आम्ही पुरेसा स्कोअर उभारू शकलो नाही. फार लवकर विकेट्स गेल्या, त्यामुळे दबाव आला. पिचवर चेंडू थोडा थांबत होता, पण त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला नाही. अशा परिस्थितीत चांगल्या फिरकी गोलंदाजांसमोर फलंदाजी करणे कठीण होते.

आमच्याकडून भागीदारी झालीच नाही, त्यामुळे डाव सावरता आला नाही. आम्हाला अजून जास्त प्रयत्न करावे लागतील आणि परिस्थिती सुधारण्यासाठी खेळाची पद्धत बदलावी लागेल.

धोनीने आपल्या सलामीवीरांवर विश्वास दर्शवला, मात्र मधल्या फळीत सुधारणा होणे गरजेचे असल्याचेही नमूद केले.


इतिहासात पहिल्यांदाच…

    • CSK चा IPL मधील सलग पाचवा पराभव

    • चेपॉक स्टेडियमवर सलग तीन पराभव – पहिल्यांदाच

    • आणि गोलंदाजीनुसार सर्वात मोठा पराभव

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा