29 C
Mumbai
Thursday, December 18, 2025
घरस्पोर्ट्समैदानावरचा सिंह आता स्वतःशी झुंजतोय…

मैदानावरचा सिंह आता स्वतःशी झुंजतोय…

Google News Follow

Related

जुलैमध्ये ४४ वर्षांचा होणारा माही… ज्याला क्रिकेटप्रेमी अजूनही ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखतात… त्याने आयपीएल २०२५ त्याचा शेवटचा हंगाम असेल की नाही, यावर अजूनही कोणतंही ठाम उत्तर दिलेलं नाही.

कोलकात्याविरुद्ध मिळालेल्या दमदार विजयानंतर धोनीने स्पष्ट शब्दांत सांगितलं –

“मी वर्षात फक्त दोन महिने क्रिकेट खेळतो. जेव्हा हा हंगाम संपेल, तेव्हा पुन्हा सहा ते आठ महिने मेहनत घ्यावी लागेल, आणि मग ठरवावं लागेल की माझं शरीर हे सगळं पेलू शकेल का. त्यामुळे सध्या तरी काही ठरवलेलं नाही. पण मी जिथे गेलो, तिथे लोकांनी मला प्रचंड प्रेम दिलं, आपलेपण दिलं.”

धोनी सध्या मर्यादित वेळच फलंदाजी करत आहे. सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही सांगितलं की धोनीच्या गुडघ्यांमुळे तो जास्त वेळ फलंदाजी करू शकत नाही.

बुधवारी, धोनी १३व्या षटकात मैदानात उतरला. त्यावेळी डेवाल्ड ब्रेव्हिस अर्धशतक ठोकून बाद झाला होता. धोनीने शिवम दुबेसोबत भागीदारी केली आणि शेवटच्या षटकात आंद्रे रसेलवर एक जबरदस्त षटकार मारून सीएसकेला विजय मिळवून दिला.


🔥 सीएसकेच्या विजयात दोन नवखे हिरो – ब्रेव्हिस आणि उर्वील पटेलचा तडाखेबाज जलवा!

या विजयाचं खरं श्रेय डेवाल्ड ब्रेव्हिस आणि सीएसकेचा नवोदित खेळाडू उर्वील पटेल यांना जातं.
उर्वीलने आपल्या आयपीएल पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला!
त्याने फक्त ११ चेंडूत ३१ धावा ठोकल्या, त्यात ४ षटकार होते, आणि त्याचा स्ट्राइक रेट होता थेट २८१.८१!

यानंतर ब्रेव्हिसने मैदानावर कमाल केली. २२ चेंडूत अर्धशतक ठोकताना त्याने वैभव अरोरावर सलग ६, ४, ४, ६, ६, ४ असे फटके मारून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.

धोनी म्हणाला –

“खरे सामन्याचे क्षणच खेळाडूंच्या मानसिक ताकदीची आणि कौशल्याची खरी परीक्षा घेतात. आम्ही आता प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडलो आहोत, त्यामुळे पुढचे काही सामने म्हणजेच आयपीएल २०२६ साठीची तयारी आहे.”


🧠 धोनीचं खास क्रिकेट तत्त्वज्ञान – तंत्र नाही, तर मानसिकता महत्त्वाची!

“आमच्याकडे काही नवखे खेळाडू आहेत. त्यांना आता संधी देता येत आहे. तुम्ही त्यांना नेट्समध्ये, सराव सामन्यांत पाहू शकता, पण खरा निकाल मैदानावरच्या दबावात समजतो.
हे केवळ तंत्राचं प्रकरण नाही – खेळाडूची मानसिकता, त्याचं दृष्टिकोन हे खूप महत्त्वाचं असतं. सर्वात तांत्रिक फलंदाज सगळ्यात जास्त धावा करेलच असं नाही… जो सामना समजून घेतो, तोच यशस्वी ठरतो.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा