23 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरस्पोर्ट्सअफवांपासून सावध राहा, जबाबदार नागरिक बना!"

अफवांपासून सावध राहा, जबाबदार नागरिक बना!”

Google News Follow

Related

भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आज देशवासियांना उद्देशून एक महत्त्वाचं आणि भावनिक आवाहन केलं आहे. सध्या भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर यशस्वी कारवाई केली असून, त्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.

या कारवाईला २६ भारतीय नागरिकांच्या हत्येचं प्रत्युत्तर म्हणून अंजाम देण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सैन्याने तो हल्ला अपयशी ठरवला.

या पार्श्वभूमीवर अफवांचा धुमाकूळ सुरू असून, रोहित शर्माने एक्स (माजी ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत भारतीय सैन्य, हवाई दल आणि नौदलाच्या शौर्याचं गौरवपूर्ण वर्णन केलं आणि नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं.

“प्रत्येक क्षण, प्रत्येक निर्णयासोबत मला आपल्या थलसेना, वायुदल आणि नौदलाचा अभिमान वाटतो. हे वीर आपल्या देशाच्या गौरवासाठी खंबीरपणे उभे आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. कृपया अफवांपासून सावध रहा आणि सुरक्षित रहा!” – अशा शब्दांत रोहितने भावना व्यक्त केल्या. पोस्टच्या शेवटी त्याने #जयहिंद आणि #OperationSindoor हे हॅशटॅग्स वापरले.

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात सुरक्षेचं अत्युच्च अलर्ट घोषित करण्यात आलं आहे. देशभरातील विमानतळांवर सतर्कता वाढवण्यात आली असून, काही ठिकाणी ब्लॅकआउट व सायरनसुद्धा सुरू झाले आहेत. पाकिस्तानकडून अजूनही उकसवणूक सुरूच असून, भारतीय सैन्य त्याला कडवे उत्तर देण्याच्या तयारीत आहे.

हेही वाचा :

पाकिस्तानसोबत वाढत्या तणावामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित

पाकिस्तानी चौकी उडवली; भारतीय सैन्याने शेअर केला प्रतिहल्ल्याचा व्हिडीओ

IPL 2025 : धर्मशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द

कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांची नवीन पोप म्हणून निवड

सध्या रोहित शर्मा आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या या संघाने सुरुवातीच्या अपयशानंतर सलग सहा विजय मिळवत गुणतालिकेत चौथं स्थान मिळवलं आहे.

मात्र देशातील वाढत्या तणावामुळे आयपीएल २०२५ ला तात्पुरता ब्रेक देण्यात आला आहे. गुरुवारी धर्मशालामध्ये पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेला सामना १०.१ षटकांनंतरच थांबवण्यात आला. त्यानंतर सर्व खेळाडूंना, स्टाफ, समालोचक, आणि ब्रॉडकास्ट टीमला सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा