पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताविरुद्ध विष ओकले आहे. त्यांनी इशारा देत म्हटले की, जर भारताने पाकिस्तानचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर युद्ध हाच एकमेव पर्याय उरेल. जर्मन वृत्तसंस्था डीडब्ल्यू उर्दूला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते म्हणाले, “अशा कृतींमुळे पाकिस्तानला अस्तित्वाचा धोका निर्माण झाला आहे. पाणी ही आमची जीवनरेखा आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमचा योग्य वाटा सोडणार नाही.”
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला. भारताने म्हटले होते की, ‘पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही.’ भारताच्या या कारवाईनंतर पाकनेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पाक मंत्री, नेते भारताला धमक्या देण्याचे काम करत आहेत. या मुद्यावरून इतर देशांनी सहभागी होत तोडगा काढवा अशी विनंती देखील पाककडून करण्यात येत आहे. मात्र, भारताने ठणकावले आहे कि यामध्ये तिसऱ्याचा हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही. तसेच पाकच्या पोकळ धमक्यांना भारत ढुंकूनही पाहत नाही.
अशा परिस्थितीत पाक पुन्हा भारताला धमक्या देण्याचे काम करताना दिसत आहे. खरे तर, भारतासोबतच्या संघर्षानंतर बिलावल यांच्या नेतृत्वाखालील एक उच्चस्तरीय पाकिस्तानी संसदीय शिष्टमंडळ वॉशिंग्टन, न्यूयॉर्क आणि लंडन येथे त्यांच्या देशाची बाजू मांडण्यासाठी पोहोचले होते. अमेरिकेत प्रचंड अपमान सहन करावा लागला तरीही युरोपियन युनियनच्या नेत्यांना पटवून देण्यासाठी हे शिष्टमंडळ ब्रुसेल्सला पोहोचले आहे. अमेरिकेत अनेक खासदारांनी या शिष्टमंडळाला दहशतवाद सोडून दहशतवाद्यांना भारतात प्रत्यार्पण करण्यास सांगितले होते.
हे ही वाचा :
डेन्मार्कची बुरखाबंदी… भारतातील ‘पहले हिजाब’ म्हणणाऱ्यांसाठी धडा
पाकिस्तानचे ‘उम्मा’ चुम्मा ना दे…
आमदार भातखळकरांच्या हस्ते आशा नगर येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ!
हिंदू मुलींना अडकवा, लग्न करा आणि वेश्या व्यवसायात ढकला! कॉंग्रेसचे लव्ह जिहादसाठी फंडिंग?
मुलाखतीदरम्यान, बिलावल यांनी भारताने पाकिस्तानला जाणारा पाणीपुरवठा थांबवण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे म्हटले. त्यांनी जोर दिला की, जर भारत पाण्याचा वापर आक्रमणासाठी करत असेल तर “पाकिस्तानकडे युद्धाशिवाय पर्याय राहणार नाही”. ते पुढे म्हणाले, आम्हाला युद्ध नको आहे. परंतु देशाचे अस्तित्व आणि जलसुरक्षा यावर वाटाघाटी करता येणार नाही. दरम्यान, पाक नेत्यांकडून भारताविरुद्ध अशा धमक्या काही नव्या नाहीत, यापूर्वीही अनेक धमक्या दिल्या आहेत, देत आहेत. विशेष म्हणजे, पाक नेते एकीकडे युद्धाची भाषा करत आहेत आणि दुसरीकडे शांततेसाठी भारतासोबत बोलण्यास तयार असल्याचेही सांगत आहेत.







