इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इराणच्या अणुकेंद्रावर अमेरिकेच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आणि इस्रायल आणि अमेरिकेला कठोर आणि निर्णायक प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. त्यांनी शपथ घेतली की शत्रूंना याची कठोर शिक्षा भोगावी लागेल. इराणच्या सर्वोच्च नेत्याने एक्स वर त्यांनी लिहिले, “शिक्षा सुरूच आहे. झिओनिस्ट शत्रूने मोठी चूक केली आहे, मोठा गुन्हा केला आहे; त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला शिक्षा होत आहे.”
रविवारी (२२ जून) अमेरिकेने इराणच्या फोर्डो अणुऊर्जा केंद्रावरील पर्वतावर आणि इतर दोन ठिकाणी ३०,००० पौंड वजनाचे बंकर-बस्टर बॉम्ब टाकले. त्यामुळे इराणने अमेरिकेच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्याची प्रतिज्ञा केली आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान म्हणाले की अमेरिकेला “प्रत्युत्तर मिळालेच पाहिजे”. त्यांनी इराणी अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले केल्याबद्दल अमेरिकेचा निषेध केला. “अमेरिकनांना त्यांच्या आक्रमकतेला उत्तर मिळाले पाहिजे,” असे पेझेश्कियान यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवरून बोलताना सांगितले.
तथापि, खामेनी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अमेरिकेचा उल्लेख केलेला नाही. इराण अमेरिकेविरुद्ध प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असल्याच्या बातम्याही येत आहेत. दरम्यान, दोनही देश मागे हटण्यासाठी तयार नाहीयेत. एकमागून एक दोनही बाजूने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले सुरु आहेत. या संघर्षात अनेकांचे मृत्यू झाले आहेत तर जखमींची संख्या देखील मोठी आहे. इस्रायल आणि इराणने शांतात राखण्याचे अनेक देशांनी आवाहन केले आहे.
हे ही वाचा :
बनावट नोटा प्रकरणातील आरोपीला दुबई येथून प्रत्यार्पणानंतर मुंबईत अटक







