जर्मनीमध्ये १६ ते २७ जुलै या कालावधीत होणाऱ्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा ४०४ सदस्यांचे पथक रवाना होणार आहे. त्यात ३०४ खेळाडू आणि अधिकारी सहभागी होतील.

एकूण २३४ क्रीडा प्रकार या स्पर्धेत खेळविले जाणार असून त्यात ऍथलेटिक्समध्ये सर्वाधिक ५१ स्पर्धा होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रथमच यावेळी भारताचा बास्केटबॉल संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. यात राजस्थानचे सहा खेळाडू सहभागी आहेत. राजस्थान विद्यापीठाचे यशवर्धन सिंह, मणिपाल विद्यापीठाचे मोहम्मद इशान खान, कृष्णपाल सिंह गोहील, लोकेश शर्मा, कीर्तीराज सिंह, कोटा विद्यापीठाचे के. जे. एंटोनियो पिंटो सहभागी आहेत.
हे ही वाचा:
…तर आधी गावे विकसित करावी लागतील
अबू धाबीतील बीएपीएस हिंदू मंदिर अध्यात्म, ऐक्याचे अद्वितीय प्रतीक
‘चक्रासन’ पासून ‘वृक्षासन’ पर्यंत प्रभावी योगासने
जयपूरच्या रीना पुनिया या भारतीय पथकाच्या व्यवस्थापक असतील. १५० देशातील साडेआठ हजार स्पर्धक या स्पर्धेत खेळणार आहेत. ३/३ बास्केटबॉल, रोइंग, बीच व्हॉलीबॉल या खेळांचा समावेश या स्पर्धेत वैकल्पिक प्रकार म्हणून करण्यात आला आहे.

जर्मनीतील बर्लिन शहरासह पाच ठिकाणी या स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत. जलतरण, वॉटरपोलो, तायक्वांडो, जुडो, तलवारबाजी, रोइंग, तिरंदाजी अशा स्पर्धा प्रकारांचा समावेश या स्पर्धेत आहे.








