महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेत, एका १९ वर्षीय महिलेने प्रवासादरम्यान स्लीपर कोच बसमध्ये बाळाला जन्म दिला आणि नंतर तिच्या सोबत असलेल्या पुरुषाने, जो तिचा पती होता, त्याने त्या नवजात बाळाला बसच्या खिडकीतून फेकून दिले, ज्यामुळे बाळाचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
ही घटना मंगळवारी सकाळी सुमारे ६.३० वाजता पाथरी-सेलू रोडवर घडली. एका सतर्क नागरिकाने बसमधून कपड्यात गुंडाळलेली वस्तू फेकताना पाहून लगेचच पोलिसांना कळवले. या महिलेचे नाव ऋतिका ढेरे असे आहे. ती पुण्याहून परभणीकडे संत प्रयाग ट्रॅव्हल्सच्या स्लीपर कोच बसने प्रवास करत होती. तिच्या सोबत अल्ताफ शेख नावाचा इसम होता, जो स्वतःला तिचा पती असल्याचे सांगत होता. प्रवासादरम्यान ऋतिकाला प्रसूती कळा सुरू झाल्या आणि तिने एका मुलाला जन्म दिला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्या दोघांनी नवजात बाळाला कपड्यात गुंडाळले आणि नंतर ते बसच्या खिडकीतून फेकून दिले. बसच्या चालकाने हे पाहिले आणि त्याने दोघांना प्रश्न विचारले. त्यावेळी शेखने सांगितले की, त्याच्या पत्नीला गाडीमध्ये उलटी झाली होती.
दरम्यान, एका सतर्क नागरिकाने त्या गुंडाळलेल्या वस्तूची तपासणी केली असता त्यात नवजात बाळ सापडले. त्याने तात्काळ ११२ हेल्पलाइनवर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेचच बसला थांबवून तपास केला आणि दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कबूल केले की, बाळाचे पालन पोषण करता येणार नाही म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले. बाळाला रस्त्यावर फेकल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि मृत्यू झाला.
हे ही वाचा:
ते स्वतः जामिनावर बाहेर आहेत हे विसरले वाटतं
बघा कसा उडाला आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा
“टी-२० मालिका जिंकली, आता वनडेवर मोहोर मारण्याची वेळ!”
किंग चार्ल्सनी लॉर्ड्स टेस्ट पाहून दिले सरप्राईज
पोलिसांच्या माहितीनुसार, दोघेही परभणीतील रहिवासी असून मागील दीड वर्षांपासून पुण्यात राहत होते. त्यांनी आपले पती-पत्नीचे नाते सांगितले असले तरी, त्यासाठी कोणताही अधिकृत पुरावा सादर करू शकले नाहीत.
ऋतिका ढेरेला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाथरी पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर भारतीय दंड संहिता (भारतीय न्याय संहिता) कलम 94(3) आणि 94(5) अंतर्गत (गुप्तपणे जन्म लपवणे आणि मृतदेहाची गुप्त विल्हेवाट) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींना नोटीस देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.







