हरियाणाच्या शिकोहपूर जमीन व्यवहार प्रकरणात प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती आणि उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीवर इतरांबरोबर मिळून फसवणूक केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने या प्रकरणात वाड्रा यांच्यासह ११ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
हे संपूर्ण प्रकरण २०१८ मधील आहे. हरियाणाच्या तौरू येथील रहिवासी सुरेंद्र शर्मा यांच्या तक्रारीवरून १ सप्टेंबर २०१८ रोजी गुरुग्रामच्या खेरकी दौला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारकर्त्याचा आरोप आहे की, वाड्रा यांच्या कंपनीने फेब्रुवारी २००८ मध्ये गुड़गांवच्या शिकोहपूर येथे ३.५ एकर जमीन ७.५ कोटी रुपयांना ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून विकत घेतली होती. व्यावसायिक परवाना (कमर्शियल लायसन्स) मिळाल्यानंतर, तीच मालमत्ता डीएलएफ कंपनीला ५८ कोटी रुपयांना विकली गेली. म्हणजेच कमी दराने जमीन खरेदी करून मोठा नफा मिळवण्यात आला आणि मनी लॉन्ड्रिंग (काळा पैसा पांढरा करणे) करण्यात आला, असा आरोप आहे.
हेही वाचा..
काँग्रेसच्या काळात राजस्थान पेपरफुटीने होता त्रस्त
कर्नाटकमधील गडग जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’, पण हिंदू युवकावरच धर्मांतरणाची सक्ती
पंतप्रधान मोदी १८ जुलैला बिहार, पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर
बिहारमध्ये १२५ युनिटपर्यंत वीज मोफत
रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनीने इतर आरोपींसोबत मिळून फसवणूक केल्याचा आरोप असून, या प्रकरणात हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनाही आरोपी बनवण्यात आले आहे. या प्रकरणात आयपीसी कलम ४२०, १२०, ४६७, ४६८ आणि ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आयपीसी कलम ४२३ अंतर्गतही नवीन आरोप जोडले गेले. एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे की, नियमांना धाब्यावर बसवून वाड्रा यांना कोट्यवधींचा आर्थिक फायदा करून देण्यात आला.
हे व्यवहार झाले, त्यावेळी हरियाणात काँग्रेसची सत्ता होती आणि मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा होते. ईडी या प्रकरणात वाड्रा यांच्या कंपनीतील आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करत आहे. उल्लेखनीय म्हणजे, रॉबर्ट वाड्रा यांच्यावर याआधीही अनेक प्रकरणांमध्ये ईडीची कारवाई सुरू आहे. १४ जुलै रोजी ईडीने हथियार डीलर संजय भंडारी प्रकरणात वाड्रा यांची चौकशी केली होती.







