भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांमध्ये आज निर्णायक तिसरा वनडे सामना चेस्टर-ले-स्ट्रीट येथे रंगणार आहे. सध्या सिरीज १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे आजचा सामना म्हणजे विजेतेपदाची अंतिम लढत ठरणार आहे.
पहिल्या सामन्यात भारताने ४ विकेट्सने बाजी मारली होती. तर दुसरा सामना पावसामुळे डकवर्थ-लुईस नियमांनुसार इंग्लंडने ८ विकेट्सने जिंकला. आता दोन्ही संघ मैदानात उतरतील सिरीज आपल्या नावावर करण्याच्या निर्धाराने!
हा सामना केवळ सिरीज विजयासाठी महत्त्वाचा नाही, तर २०२५ साली भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या महिला वनडे विश्वचषकाच्या तयारीचा अंतिम सराव म्हणूनही पाहिला जात आहे.
भारतीय संघाकडून अपेक्षा आहेत स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, प्रतिका रावल, जेमिमा रोड्रिग्स आणि हरलीन देओल यांच्याकडून. गोलंदाजी विभागात स्नेह राणा, श्री चरणी आणि क्रांती गौड यांची कसोटी लागणार आहे.
इंग्लंडच्या संघात सोफिया डंकले, एलिस डेविडसन रिचर्ड्स, कर्णधार नैट सायव्हर-ब्रंट, एम्मा लॅम्ब आणि चार्ली डीन यांच्याकडे सामन्याचे पारडे फिरवण्याची ताकद आहे.
मात्र हवामानाची चाचपणी करावी लागणार आहे, कारण चेस्टर-ले-स्ट्रीटमध्ये पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान २० अंश सेल्सिअस आणि किमान १२ अंश असल्याचा अंदाज आहे.
आजवर भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये एकूण ७८ वनडे सामने खेळले गेले असून भारताने त्यातील ३५ सामन्यांत विजय मिळवला आहे. इंग्लंडने ४१ सामने जिंकले असून दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत.
आजचा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५:३० वाजता सुरू होईल. थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क वर आणि थेट प्रसारण SonyLIV अॅप व वेबसाइटवर पाहता येईल.
हेही वाचा:
केरळमध्ये अडकलेले F-३५ विमान झाले दुरुस्त, आज होणार उड्डाण चाचणी!
बांगलादेश हवाई दलाचे विमान ढाक्यातील शाळेवर कोसळले, एकाचा मृत्यू!
फसवणूक प्रकरणात श्रेयस तळपदेला दिलासा
वैष्णो देवी यात्रेच्या मार्गावर भूस्खलन
भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), यास्तिका भाटिया, प्रतिका रावल, हरलीन देओल, ऋचा घोष, जेमिमा रोड्रिग्स, क्रांती गौड, तेजल हसबनीस, अमनजोत कौर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, सयाली सतघरे, दीप्ती शर्मा, श्री चरणी, राधा यादव.
इंग्लंड संघ
नैट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), एम अलॉर्ट, टॅमी ब्युमाँट, लॉरेन बेल, मैया बाउचियर, एलिस कॅप्सी, केट क्रॉस, एलिस डेविडसन रिचर्ड्स, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फाइलर, एमी जोन्स, एम्मा लॅम्ब, लिंसी स्मिथ.







