भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी दोन मोठे झटके बसले आहेत.
ऑलराउंडर नितीश रेड्डी डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेबाहेर गेले आहेत, तर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह देखील चौथ्या कसोटीतून बाहेर गेला आहे.
नितीश रेड्डी – अपूर्ण कारकीर्द, संपलेले स्वप्न
नितीश रेड्डीने पहिल्या कसोटीत फेल ठरला होता. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत संधी मिळाली. बर्मिंगहॅममध्ये अपयश आलं, पण लॉर्ड्समध्ये त्याने दोन्ही डिपार्टमेंटमध्ये काही योगदान दिलं नाही.
दुर्दैवाने, डाव्या गुडघ्यातील दुखापत वाढली, आणि वैद्यकीय पथकाने त्याला मालिका सोडण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आता पुन्हा एकदा शार्दुल ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता आहे.
अर्शदीप सिंह – दुखापत झाली अंगठ्याला, झटका बसला संघाला
नेट प्रॅक्टिसदरम्यान बेकनहॅममध्ये अर्शदीपच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे तो २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या मँचेस्टर कसोटीतून बाहेर पडला आहे.
बीसीसीआयने जाहीर केलं की, “अर्शदीपवर वैद्यकीय निरीक्षण सुरू असून, त्याची जागा भरून काढण्यासाठी हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज याला संघात स्थान देण्यात आलं आहे.”
बुमराहवर वाढला भार, पंतवर प्रश्नचिन्ह
आधीच आकाश दीप दुखापतीमुळे त्रस्त, त्यात अर्शदीपही संघाबाहेर, त्यामुळे आता जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर सर्वांची नजर आहे. उर्वरित दोन कसोट्यांपैकी केवळ एकच खेळण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून समजतंय.
याशिवाय, ऋषभ पंतच्या बोटाला दुखापत असल्याने तो जर केवळ फलंदाज म्हणूनच खेळला, तर ध्रुव जुरेलला ‘विकेटकीपर’ म्हणून उतरवण्यात येणार आहे.
भारताचा संघ – चौथी कसोटी (२३ जुलैपासून, मँचेस्टर):
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), यशस्वी जयसवाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कंबोज
सध्याची स्थिती:
इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी २२ धावांनी जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला ही कसोटी जिंकून बरोबरी करावी लागणार आहे… आणि तेही अर्धा संघ दुखापतीत असताना!







