28.4 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरविशेषकाजोल आणि ट्विंकल खन्ना जोडी करणार धमाल

काजोल आणि ट्विंकल खन्ना जोडी करणार धमाल

Google News Follow

बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि लेखिका ट्विंकल खन्ना लवकरच ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या आगामी टॉक शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. या शोमध्ये दोघीही मनोरंजनविश्वातील खास गप्पांमध्ये सहभागी होणार आहेत. या शोमध्ये बॉलिवूड आणि इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज हस्ती सहभागी होणार आहेत. प्राईम व्हिडीओ इंडियाचे संचालक आणि ओरिजिनल्सचे प्रमुख निखिल मधोक यांनी एका निवेदनात या शोची घोषणा केली आहे.

ते म्हणाले, “काजोल आणि ट्विंकल यांच्यासोबत ‘टू मच’ची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हा असा पहिलाच टॉक शो आहे जो भारतीय मनोरंजन क्षेत्रातील दोन प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वे एकत्र होस्ट करणार आहेत. यामुळे शोला एक नवा रंग मिळेल. या शोमध्ये इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे पाहायला मिळणार आहेत. काजोल आणि ट्विंकल आपल्या खास शैलीत पाहुण्यांशी संवाद साधणार आहेत. या शोमध्ये मनोरंजनविश्वातील गप्पा, किस्से आणि अनुभव शेअर केले जातील.

हेही वाचा..

आयुष्मान भारत योजनेमुळे रितेशला मिळाले नवे जीवन

अटॅक अपाचे हेलिकॉप्टर भारतात!

भारतीय उच्चायोगाने बांगलादेश सरकारला पत्र

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला

बनिजय एशिया आणि एंडेमोल शाईन इंडिया यांच्या ग्रुप चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर मृणालिनी जैन यांनी “टू मच विथ काजोल अँड ट्विंकल” या अपकमिंग टॉक शोबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, “हा शो भारतातील काही मोठ्या सेलिब्रिटींबरोबर असेल, जे बेधडकपणे आपली मते मांडतील आणि मनोरंजन क्षेत्रातील अनुभव शेअर करतील. त्यांनी असेही सांगितले, “हा शो काजोल आणि ट्विंकल यांच्या खास, निडर आणि ताज्या शैलीने भरलेला असेल. यात मैत्री, जीवनानुभव आणि भरपूर हसवणारे क्षण पाहायला मिळतील.

तसेच त्यांनी सांगितले, “बनिजय एशिया मध्ये आम्ही असे ओरिजिनल फॉरमॅट तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत जे प्रेक्षकांना गुंतवून ठेवतील. ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ साठी प्राइम व्हिडीओपेक्षा उत्तम स्ट्रीमिंग पार्टनर आम्हाला मिळूच शकला नसता, कारण प्राइम व्हिडीओने भारतातील अनस्क्रिप्टेड कंटेंटला एक नवे वळण दिले आहे.” ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ लवकरच प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा