प्रसिद्ध अमेरिकन कुस्तीपटू हल्क होगन (मूळ नाव: टेरी जीन बोलिया) यांचे २४ जुलै रोजी फ्लोरिडामधील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. TMZ च्या माहितीनुसार, वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले आणि क्लिअरवॉटर येथून त्यांना स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.
WWE ने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून त्यांच्या निधनाची पुष्टी केली आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती व चाहत्यांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या.
‘हल्कामेनिया’चा उदय
११ ऑगस्ट १९५३ रोजी ऑगस्टा, जॉर्जिया येथे जन्मलेले हल्क होगन हे १९८० च्या दशकात WWE (पूर्वाश्रमीचे WWF) या संघटनेचे सर्वात लोकप्रिय आणि ओळखले जाणारे खेळाडू होते. त्यांची झुपकेदार मिशी, डोके झाकणारे कापड आणि महाकाय शरीर यामुळे ते पटकन लोकांच्या लक्षात राहायचे.
१९८३ मध्ये WWF मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली. त्यांचं घोषवाक्य होतं…“Train, say your prayers, eat your vitamins, and believe in yourself.” हे विशेषतः लहान मुलांमध्ये खूप लोकप्रिय होते.
हे ही वाचा:
रोज सात हजार पावले चालण्याचे प्रचंड फायदे कोणते ?
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर कुलूपबंद मंदिर-गुरुद्वारा ४२ वर्षांनी उघडले!
के. एल. राहुल इंग्लंडमध्ये १०००+ धावा करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत
इंग्लंड दौऱ्यात भारत पासा पलटू शकतो!
ऐतिहासिक क्षण
-
१९८४ मध्ये द आयर्न शेखला हरवून ते WWF चॅम्पियन बनले. WrestleMania I (१९८५) मध्ये Mr. T सोबत टॅग टीम केली. WrestleMania III मध्ये आंद्रे द जायंटला बॉडी स्लॅम देणे, हा क्षण आजही कुस्तीच्या इतिहासातील सर्वात प्रतीकात्मक क्षण मानला जातो. त्यांनी पहिल्या नऊ WrestleMania पैकी आठ मध्ये मुख्य भूमिका बजावली होती.
१९९४ मध्ये WCW (World Championship Wrestling) मध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांनी १९९६ मध्ये “व्हिलन” बनून “New World Order (nWo)” स्थापन केली, ज्यामध्ये स्कॉट हॉल आणि केविन नॅश हे सहभागी होते. या परिवर्तनाने त्यांच्या कारकिर्दीला नवे वळण लाभले. २००२ मध्ये WWE मध्ये पुनरागमन करत त्यांनी द रॉक, शॉन मायकेल्स, ब्रॉक लेसनर, कर्ट अँगल अशा दिग्गजांशी लढती केल्या. २००५ मध्ये WWE हॉल ऑफ फेममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला.
रंगमंचावरचा प्रवास
त्यांनी सबर्बन कमांडो, मिस्टर नॅनी या चित्रपटांत काम केले तसेच होगान नोज बेस्ट हा त्यांचा शो लोकप्रिय ठरला.







