योग हा केवळ एक व्यायाम नाही, तर शरीर आणि मनाला एकत्र जोडण्याचा एक अतिशय सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. योगामुळे आपले आरोग्य टिकून राहते आणि मानसिक शांतीही मिळते. नियमित योगसाधनेमुळे शरीरात उर्जा टिकून राहते आणि दिवसभर ताजेपणा जाणवतो. अशाच अनेक योगासनामधील एक प्रभावी आसन म्हणजे ‘उत्तानासन’, जे शरीराला बळकट करतं आणि मनाला प्रसन्न करतं.
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानुसार, उत्तानासन हे एक असे आसन आहे जे शरीराच्या अनेक भागांना ताण देतं. विशेषतः जे लोक दिवसभर बसून काम करतात किंवा संगणकासमोर काम करत असतात, त्यांच्या साठी हे आसन फारच फायदेशीर ठरतं. या आसनामुळे पिंडर्या, मांड्या, कंबर आणि पाठीच्या मांसपेशींना ताण मिळतो आणि त्या बळकट होतात. हे आसन मानसिक तणाव कमी करण्यासही मदत करतं. उत्तानासन करताना जेव्हा आपण शरीर पुढे झुकवतो, तेव्हा खालच्या शरीरातून रक्ताचा प्रवाह मेंदूकडे अधिक वेगाने होतो. त्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा अधिक पुरवठा होतो आणि यामुळे तणाव कमी होतो.
हेही वाचा..
धर्मांतरविरोधी कायदा अधिक कठोर करा
‘ऑपरेशन महादेव’: पहलगाम हल्ल्याशी संबंधित ३ संशयित दहशतवादी ठार!
कर्नल सोफिया यांच्यावरील टीका प्रकरण : ‘त्या’ मंत्र्याला सुप्रीम कोर्टाने झाडले
गाझा पट्टीमधील भूकबळीबद्दल ट्रम्प यांची खंत
उत्तानासन डोकेदुखी आणि अनिद्रेमध्येही उपयुक्त आहे. शरीर झुकवताना मेंदूकडे होणाऱ्या रक्तप्रवाहामुळे डोकेदुखी कमी होते आणि तणाव हलका होऊन झोप चांगली लागते. हे आसन पचनतंत्रालाही बळकट करतं. यामुळे पोट आणि त्याभोवतालच्या मांसपेशींवर ताण येतो, ज्यामुळे पचनतंत्र सक्रीय होतं. त्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
मांड्या आणि गुडघ्यांच्या बळकटीसाठीही उत्तानासन उपयुक्त आहे. खाली झुकताना त्या भागांवर दबाव येतो, त्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो आणि शरीराचं संतुलन सुधारतं. उत्तानासन कसं करावं? सरळ उभं राहा आणि दोन्ही हात कंबरेवर ठेवा. खोल श्वास घ्या आणि कंबर पासून पुढे वाकण्यास सुरुवात करा. हातांनी टाचा पकडा, आणि दोन्ही पाय सरळ व समांतर ठेवा. या स्थितीत ३० सेकंद ते १ मिनिट रहा. शेवटी, श्वास सोडत हळूहळू सरळ उभं राहा. जर पाठी किंवा कंबरेला दुखापत असेल, तर हे आसन करू नये. सायटिका (sciatica) असलेल्या रुग्णांसाठी हे आसन टाळावं, कारण यामुळे त्रास वाढू शकतो. गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे आसन करू नये.







