बिहारच्या मिथिलाक्षेत्रातील दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातेबाबत कथित अपमानकारक वक्तव्य केल्याच्या घटनेवरून बिहारचे मंत्री संजय सरावगी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देत कॉंग्रेस नेत्यांसह पक्षावर जोरदार टीका केली आहे.
मंत्री संजय सरावगी म्हणाले, “या लोकांनी नीचतेचा कळस गाठला आहे. मिथिला ही जानकी मातेची भूमी आहे, आणि या लोकांनी त्या पवित्र भूमीची प्रतिमा मलीन केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबाबत अपशब्द, शिवीगाळ आणि अपमानकारक भाषा वापरण्यात आली. यामुळे संपूर्ण मिथिलाभूमीचा अपमान झाला आहे.”
ते पुढे म्हणाले, “मिथिलेमधील प्रत्येक नागरिक या प्रकाराने संतप्त आहे. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी ‘वोट अधिकार यात्रा’ न काढता ‘प्रायश्चित्त यात्रा’ काढावी. हा सगळा प्रकार केवळ एका विशिष्ट समाजघटकाला खुश करण्यासाठी करण्यात आला आहे, पण मिथिलावासी हा अपमान कधीच विसरणार नाहीत.” या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून विरोधकांवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. मिथिलावासीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत मंत्री सरावगींनी संबंधित वक्तव्याची निषेध करण्याची मागणीही केली आहे.
हे ही वाचा :
तामिलनाडूत २०२६ मध्ये क्रांती होणार
‘मतदार अधिकार यात्रा’ म्हणजे ‘घुसखोर बचाव यात्रा’
जागतिक आरोग्य संघटनेची हैजा प्रादुर्भावाबद्दल चिंता
ईडीच्या कारवाईत ९.३१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
दरम्यान, राहुल गांधी यांच्या ‘मतदार अधिकार यात्रे’ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल अपशब्द वापरण्यात आले होते. यावरून भाजपाकडून राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली जात असून माफी मागण्याची मागणी केली जात आहे. दरभंगा येथे घडलेल्या या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये काँग्रेस कार्यकर्ते व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरताना दिसत होते.
#WATCH | Patna: On alleged derogatory remarks against PM Modi and his mother in Darbhanga, Bihar Minister Sanjay Saraogi says, "These people have reached the pinnacle of lowliness. Mithila is the land of Janaki Maa, and these people have tarnished the image of this place.… pic.twitter.com/xhLyYnFlWl
— ANI (@ANI) August 30, 2025







