केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवारी गुजरातमधील भूज येथील १७६ व्या बटालियन कॉम्प्लेक्समध्ये आयोजित सीमा सुरक्षा दलाच्या ६१ व्या स्थापना दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अमित शाह यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि देशातील नक्षलवादाच्या घटत्या प्रभावाचाही उल्लेख केला. तसेच त्यांनी आश्वासन दिले की, ते घुसखोरांना शोधून हाकलून लावणार.
अमित शाह यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान बीएसएफ आणि सशस्त्र दलांच्या शौर्याचे कौतुकही केले. ते म्हणाले, “काही दिवसांतच, बीएसएफ आणि लष्कराच्या शौर्यामुळे, पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूर दरम्यान एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली. यामुळे संपूर्ण जगाला हे स्पष्ट झाले की भारताच्या सीमा आणि सुरक्षा दलांशी कोणतीही तडजोड केली जाऊ नये, अन्यथा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.” पुढे ते म्हणाले, “आमच्या सैन्याने नऊ ठिकाणी हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय, प्रशिक्षण शिबिरे आणि लॉन्चिंग पॅड उद्ध्वस्त केले. या ऑपरेशनचा उद्देश दहशतवादाचा नायनाट करणे आणि आपल्या नागरिकांचे, सीमावर्ती भागांचे संरक्षण करणे हा होता. नक्षलग्रस्त भागातही बीएसएफने महत्त्वाची कामगिरी केली आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा हा देश कायमचा नक्षलवादापासून मुक्त होईल.”
हे ही वाचा:
जगातील प्रत्येक पाच आयफोनपैकी एक आयफोन तयार होतो भारतात
“बेंगळुरूच्या रहदारीतून प्रवास करण्यापेक्षा अंतराळात प्रवास करणे सोपे”
भारताचे अन्नधान्य उत्पादनाची गरुडझेप
इंडियन कोस्ट गार्डकडून २८ क्रू अटकेत
केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशवासीयांना मतदार यादीसाठी एसआयआर प्रक्रियेला पूर्ण पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की ही प्रक्रिया देश आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी महत्त्वाची आहे. शहा यांनी स्पष्ट केले की ही प्रक्रिया मतदार यादीतून प्रत्येक घुसखोराला काढून टाकेल. अमित शाह पुढे म्हणाले की, मी आज हे स्पष्ट करू इच्छितो की आम्ही या देशातील प्रत्येक घुसखोराला हाकलून लावू, ही आमची प्रतिज्ञा आहे. त्यांनी सांगितले की एसआयआर प्रक्रिया देश आणि आपली लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. कोणत्याही पक्षाचे नाव न घेता शाह म्हणाले की काही राजकीय पक्ष घुसखोरांना हाकलून लावण्याच्या या मोहिमेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी अशा पक्षांना इशारा दिला आणि सांगितले की बिहार निवडणुकीत जनतेने एनडीएला आधीच जनादेश दिला आहे.







