रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात चर्चा होणार असून संपूर्ण जगाचे लक्ष या भेटीकडे लागलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्लादिमीर पुतिन यांचे स्वागत केले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना भगवद्गीतेची रशियन आवृत्ती भेट दिली. तसेच हा पवित्र ग्रंथ जगभरातील लाखो लोकांसाठी प्रेरणास्रोत असल्याचे म्हटले.
नरेंद्र मोदींनी एक्सवर भगवद्गीता देतानाच फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोन्ही नेते दिल्लीतील त्यांच्या भेटीदरम्यान पुस्तक हातात धरलेले दिसत आहेत. “राष्ट्रपती पुतिन यांना रशियन भाषेतील गीतेची प्रत भेट दिली. गीतेतील शिकवण जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देते,” असे पंतप्रधानांनी लिहिले आहे. दोन्ही नेत्यांमधील ही बैठक पंतप्रधानांच्या ७, लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी झाली. हा परिसर भारत- रशिया ध्वज आणि विशेष रोषणाईने उजळून निघाला होता. मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांचे खाजगी जेवणासाठी स्वागत केले.
Presented a copy of the Gita in Russian to President Putin. The teachings of the Gita give inspiration to millions across the world.@KremlinRussia_E pic.twitter.com/D2zczJXkU2
— Narendra Modi (@narendramodi) December 4, 2025
पुतिन दोन दिवसांच्या भारत भेटीसाठी संध्याकाळी दिल्लीत दाखल झाले होते. दोन्ही नेत्यांमधील मैत्री यावेळी अनेक गोष्टींमधून दिसून आली. नरेंद्र मोदींनी पुतीन यांचे स्वागत केले आणि विमानतळावरून त्यांच्यासोबत त्याच गाडीने प्रवास केला. एकाच गाडीतील या नेत्यांच्या प्रवासाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या कृतीतून पंतप्रधानांनी अनेक वर्षांपासूनची भारत- रशिया मैत्री अबाधित असल्याचे अधोरेखित केली.
हेही वाचा..
कमी तापमानामुळे वीजेची मागणी घटून १२३ अब्ज युनिटवर
स्वराज कौशल यांना पंतप्रधानांकडून श्रद्धांजली !
‘वंदे मातरम’चा विरोध म्हणजे देशद्रोही मानसिकता
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात
नरेंद्र मोदींनी यापूर्वी एक्सवर एक संदेश पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, ते गुरुवार रात्री आणि शुक्रवारी होणाऱ्या चर्चेसाठी उत्सुक आहेत. “माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे भारतात स्वागत करताना आनंद झाला. आज संध्याकाळी आणि उद्याच्या आमच्या संवादांची उत्सुकता आहे. भारत- रशिया मैत्री ही काळाच्या कसोटीवर उतरलेली मैत्री आहे ज्याचा आपल्या लोकांना खूप फायदा झाला आहे,” असे त्यांनी लिहिले.







