34 C
Mumbai
Sunday, October 4, 2026
घरराजकारणमुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र लढणार

मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र लढणार

पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा

Google News Follow

Related

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी युती केल्याची घोषणा बुधवार, २४ डिसेंबर रोजी करण्यात आली. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत, युतीची घोषणा केली. ठाकरे बंधूंनी युतीबाबत जाहीर केलं असलं तरी दोन्ही पक्षांतर्फे जागावाटपाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसे महापालिका निवडणुकीत कुठे आणि किती जागा लढवणार यावर अद्यापही पडदा आहे.

“आम्हाला जे काही बोलायचं आहे, ते आम्ही येत्या काळात जाहीर सभांमध्ये बोलूच. कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे मी आधीही बोललो होतो, तिथूनच एकत्र येण्याची सुरूवात झाली. आमचे दोन्ही पक्ष, कोण किती जागा लढवणार, कुठे लढवणार हे सगळं आता सांगणार नाही. महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवण्याच्या टोळ्या फिरत आहे. त्यात दोन जास्त टोळ्या सामील झाल्या आहेत. त्या राजकीय पक्षातील टोळ्या पळवतात,” अशी टिपण्णी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, “गेल्यावेळी भाजपने नरेटिव्ह सेट केलं होतं ‘कटेंगे तो बटेंगे’ यावेळी मी सांगतो, आता चुकाल तर संपाल. तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका,” असे आवाहन त्यांनी मराठी माणसांना केले. तसेच उद्धव ठाकरे यांनी मराठी मतदारांना साद घातली आहे. दोन्ही बंधू एकत्र आले असून मराठी माणसांनी पाठीशी राहावं असं आवाहन त्यांनी केले आहे.

हे ही वाचा..

युनूस सरकारने दीपू दासच्या कुटुंबाची घेतली जबाबदारी!

“युनूस सरकारमधील एका गटाने शरीफ उस्मान हादीची हत्या केली”

“… नाहीतर कार्यालय पेटवून देऊ” ग्लोबल टीव्ही बांगलादेशला धमकी

भारताची अंतराळात मोठी झेप! इस्रोकडून सर्वात वजनदार उपग्रह प्रक्षेपित

वरळीतील हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत युतीची घोषण करण्यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवनादन केलं. दोन्ही बंधूंनंतर रश्मी ठाकरे आणी शर्मिला ठाकरे तसेच आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांनीही पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा