32 C
Mumbai
Sunday, February 8, 2026
घरराजकारणउबाठाचे ९२ उमेदवार जाहीर, ५ अमराठी- मुस्लिमांचा समावेश

उबाठाचे ९२ उमेदवार जाहीर, ५ अमराठी- मुस्लिमांचा समावेश

Google News Follow

Related

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ३० डिसेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना आता उबाठा गटाचे ९० पेक्षा अधिक उमेदवार जाहीर झाले आहेत तर १६० ते १६५ जागांवर ते उमेदवार उभे करणार असल्याचे कळते आहे. उबाठा शिवसेनेसोबत या निवडणुकीसाठी युती करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ५२ उमेदवार रिंगणात उतरणार आहेत.

२०१७ला झालेल्या निवडणुकीत तेव्हा एकत्रित असलेल्या शिवसेनेने ८४ जागी मुंबई महानगरपालिकेत विजय मिळविला होता. आता दीडशेपेक्षा अधिक जागी उमेदवार उभे करून तेवढेच उमेदवार निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. पण त्या निवडणुकीत मनसे ही शिवसेनेच्या विरोधात उभी होती यावेळी मात्र ते चित्र बदलले असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. मात्र यात महाविकास आघाडी ठाकरेंच्या सोबत नाही. काँग्रेसने मुंबईत स्वबळावर निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. मनसेसोबत जाण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे अखेर ठाकरे बंधू हेच आता एकत्रित निवडणूक लढविणार आहेत.

हे ही वाचा:

२५ हजारांचे इनाम असलेल्या गो तस्कराच्या पायावर गोळी मारून केली अटक

‘ध्रुव-एनजी’च्या उड्डाणाला हिरवा झेंडा; काय आहेत वैशिष्ट्ये?

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन; भारताशी कसे होते संबंध?

… म्हणून बांगलादेशने भारतातील उच्चायुक्तांना बोलावून घेतले

शिवसेना ठाकरे गटाने आतापर्यंत त्यांनी ९२ पेक्षा जास्त उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यांची नावे समोर आली आहेत. या यादीत ५ ते ६ अमराठी मुस्लिम उमेदवारही उबाठा शिवसेनेने दिले आहेत. मराठीच्या मुद्द्यावर हे दोन्ही बंधू या निवडणुकीला सामोरे जात असताना भाजपाच्या उमेदवार यादीत किती अमराठी उमेदवार आहेत, याचा मुद्दा उपस्थित करताना उबाठा शिवसेना पक्षानेही अमराठी उमेदवार दिले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी १० ते १२ जागा सोडल्या जाणार आहेत. मुंबईसह राज्यातील महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल लागणार आहे.

 

उबाठाच्या उमेदवारांची यादी वॉर्डक्रमांकानुसार

1 फोरम परमार

2 धनश्री कोलगे

3 रोशनी गायकवाड

4 राजू मुल्ला

5 सुजाता पाटेकर

7 सौरभ घोसाळकर

9 संजय भोसले

12 सारिका झोरे

13 आसावरी पाटील

16 स्वाती बोरकर

25 माधुरी भोईर

26 धर्मेंद्र काळे

29 सचिन पाटील

41 सुहास वाडकर

47 शंकर गुरव

49 संगीता सुतार

54 अंकित प्रभू

56 लक्ष्मी भाटिया

57 रोहन शिंदे

59 शैलेश फणसे

60 मेघना विशाल काकडे माने

61 सेजल दयानंद सावंत

62 झीशान चंगेज मुलतानी

63 देवेंद्र (बाळा) आंबेरकर

64 सबा हारून खान

65 प्रसाद आयरे

75 प्रमोद सावंत

87 पूजा महाडेश्वर

89 गितेश राऊत

93 रोहिणी कांबळे

95 हरी शास्त्री

100 साधना वरस्कर

105 अर्चना चौरे

109 सुरेश शिंदे

111 दीपक सावंत

114 राजोल पाटील

117 श्वेता पावसकर

118 सुनीता जाधव

120 विश्वास शिंदे

122 निलेश साळुंखे

123 सुनील मोरे

124 सकीना शेख

125 सतीश पवार

126 शिल्पा भोसले

127 स्वरूपा पाटील

130 आनंद कोठावदे

132 क्रांती मोहिते

134 सकीना बानू

135 समीक्षा सकरे

137 महादेव आंबेकर

138 अर्जुन शिंदे

141 विठ्ठल लोकरे

142 सुनंदा लोकरे

144 निमिष भोसले

148 प्रमोद शिंदे

153 मीनाक्षी पाटणकर

155 स्नेहल शिवकर

156 संजना संतोष कासले

157 डॉ. सरिता म्हस्के

158 चित्रा सोमनाथ सांगळे

160 राजेंद्र पाखरे

164 साईनाथ साधू कटके

167 सुवर्णा मोरे

168 सुधीर खातू वार्ड

173 प्रणिता वाघधरे

179 दीपाली खेडेकर

180 अस्मिता गावकर

182 मिलिंद वैद्य

184 वर्षा वसंत नकाशे

185 टी. एम. जगदीश

187 जोसेफ कोळी

189 हर्षला मोरे

190 वैशाली पाटील

191 विशाखा राऊत

194 निशिकांत शिंदे

195 विजय भणगे

196 पद्मजा चेंबूरकर

198 अबोली खाड्ये

199 किशोरी पेडणेकर

200 उर्मिला पांचाळ

201 रेखा कांबळे

206 सचिन पडवळ

208 रमाकांत रहाटे

210 सोनम जामसूतकर

213 श्रद्धा सुर्वे

215 किरण बालसराफ

218 गीता अहिरेकर

219 राजेंद्र गायकवाड

220 संपदा मयेकर

222 संपत ठाकूर

225 अजिंक्य धात्रक

227 रेहाना गफूर शेख

 

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा