28.9 C
Mumbai
Wednesday, November 4, 2026
घरविशेषकलिंगड प्रकरण: घरातून गोळा केलेल्या अन्नाच्या ११ नमुन्यांमध्ये विष नाही

कलिंगड प्रकरण: घरातून गोळा केलेल्या अन्नाच्या ११ नमुन्यांमध्ये विष नाही

गुढतेसह प्रकरणाला नवे वळण

Google News Follow

मुंबईतील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील चार जणांच्या रहस्यमय मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या संपूर्ण प्रकरणात नेमके मृत्यूचे कारण काय, हे स्पष्ट करण्यासाठी मुंबई पोलीस टॉक्सिकॉलॉजी अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए)च्या प्राथमिक तपासात अन्नपदार्थांमध्ये कोणतेही विषारी किंवा घातक घटक आढळले नाहीत.

तपासासाठी अधिकाऱ्यांनी कुटुंबाच्या घरातून एकूण ११ नमुने घेतले होते. त्यामध्ये बिर्याणी, कलिंगड, फ्रिजमधील पाणी, कच्चा व शिजवलेला भात, चिकन, खजूर आणि मसाले यांचा समावेश होता. या सर्व नमुन्यांच्या तपासणीत भेसळ किंवा विषबाधेचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, त्यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.

दुसरीकडे, शवविच्छेदन अहवाल काही वेगळाच संकेत देत आहे. मृतांच्या शरीरात मॉर्फीन या वेदनाशामक औषधाचे अंश आढळले आहेत. तसेच काही अवयांमध्ये असामान्य हिरवट रंग बदलही दिसून आला आहे. सामान्यतः असा बदल विषारी पदार्थामुळे होऊ शकतो. मात्र, तो नेमका कोणता पदार्थ होता आणि शरीरात कसा गेला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हे प्रकरण २६ एप्रिल रोजी समोर आले, जेव्हा ४० वर्षीय अब्दुल्ला दोकाडिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी डॉक्टरांना सांगितले की, कलिंगड खाल्ल्यानंतर त्यांची, त्यांची पत्नी नसरीन (३५) आणि दोन्ही मुली आयशा (१६) व जैनब (१३) यांची तब्येत अचानक बिघडली. परिस्थिती इतकी गंभीर झाली की चौघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ते सर्व शक्य कोनातून या प्रकरणाची चौकशी करत आहेत, मात्र अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही. कलीना फॉरेन्सिक प्रयोगशाळा, एफडीए आणि जेजे रुग्णालय यांच्या सविस्तर अहवालाची प्रतीक्षा आहे. टॉक्सिकॉलॉजी अहवालातून विषबाधा झाली होती का, आणि झाली असल्यास ती कधी झाली, हे स्पष्ट होईल. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत कोणतेही संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळलेले नाहीत. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार कुटुंब आनंदी होते आणि कोणत्याही वादाची माहिती मिळालेली नाही. कॉल डिटेल रेकॉर्ड, डिजिटल संवाद आणि इतर इलेक्ट्रॉनिक माहितीची तपासणी सुरू आहे, मात्र अद्याप ठोस धागेदोरे मिळालेले नाहीत.

हे ही वाचा:

जबलपूर दुर्घटना: बोट बुडायला लागल्यानंतर लाईफ-जॅकेटची शोधाधोध केली

जर्मनीतून ५,००० अमेरिकन सैनिकांना माघारी बोलावणार

४ वर्षीय चिमुरडीची अत्याचारानंतर हत्या; ६५ वर्षीय आरोपी अटकेत

भोंदू बाबा खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकरांना ईडीचे समन्स

दरम्यान, कलीना फॉरेन्सिक प्रयोगशाळेतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, विसरा नमुन्यांच्या प्राथमिक तपासात काही अज्ञात बाह्य कण आढळले आहेत. अधिकाऱ्यांनी म्हटले, “प्राथमिक अहवालात नमुन्यांमध्ये बाह्य घटक असल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र हे घटक विषारी आहेत की औषधी किंवा इतर कोणत्या प्रकारचे आहेत, हे अद्याप स्पष्ट नाही. सखोल तपास सुरू आहे.”

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा