28.9 C
Mumbai
Wednesday, November 4, 2026
घरविशेषसोनम वांगचुक यांच्या शाळेचे कामकाज थांबवण्याचे आदेश

सोनम वांगचुक यांच्या शाळेचे कामकाज थांबवण्याचे आदेश

लडाख प्रशासनाची नोटीस

Google News Follow

लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. लडाख प्रशासनाने वांगचुक यांनी सहस्थापना केलेल्या हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज (HIAL) अंतर्गत येणाऱ्या ‘डेजर्ट फ्लॉवर स्कूल’चे सर्व उपक्रम थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयात संस्थेच्या जमीनवाटपाशी संबंधित प्रकरण प्रलंबित असल्याने अंतिम निर्णय येईपर्यंत शाळेचे कामकाज सुरू करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लेहच्या तहसीलदार कार्यालयाने १ नोव्हेंबर रोजी एचआयएएलच्या सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गीतांजली जे. आंगमो यांना ही नोटीस बजावली. फ्यांग येथील डेजर्ट फ्लॉवर स्कूलमध्ये आवश्यक परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आणि संबंधित विभागांच्या मंजुरीशिवाय वर्ग तसेच अन्य शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गीतांजली आंगमो यांनी २२ सप्टेंबर रोजी लेहच्या उपायुक्तांकडे शाळेच्या प्रस्तावित व्यवस्थापन समितीतील सदस्यांसाठी ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. मात्र, आवश्यक मंजुरी मिळण्यापूर्वीच शाळेचे कामकाज सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

आधी राहुल गांधींनी खासदारकीचा राजीनामा द्यावा!

रशियाचा युक्रेनच्या शाळेवर दुहेरी हवाई हल्ला; २४ ठार

बीएसएफ जवानांवरील हल्ल्याप्रकरणी नऊ जणांना अटक

कनेक्टिव्हिटी वाढल्याने पुण्याच्या विकासाला चालना

काय आहे जमीनवाटपाचा वाद?

एचआयएएलला फ्यांग थांग परिसरातील १,०७६ कनाल आणि एक मरला (सुमारे १३४.५ एकर) जमीन ४० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती. पर्यायी शिक्षण आणि शाश्वत पर्वतीय विकासावर आधारित विद्यापीठ उभारण्याच्या उद्देशाने मे २०१८ मध्ये हे जमीनवाटप करण्यात आले होते. मात्र, ऑगस्ट २०२५ मध्ये लडाख प्रशासनाने हे जमीनवाटप रद्द केले. आवश्यक भाडेपट्टा करार पूर्ण न करणे, निर्धारित जमीन प्रीमियम आणि भाडे जमा न करणे तसेच विद्यापीठ स्थापन करण्याच्या अटींची पूर्तता न करणे, अशी कारणे प्रशासनाने दिली होती.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा