27.7 C
Mumbai
Tuesday, June 23, 2026
घरविशेषतात्पुरत्या बंदीनंतर टेलिग्रामचे प्ले स्टोअरवर पुनरागमन

तात्पुरत्या बंदीनंतर टेलिग्रामचे प्ले स्टोअरवर पुनरागमन

नीट पुनर्परीक्षेदरम्यान बंदीचा घेतला होता निर्णय

Google News Follow

Related

मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्राम मंगळवार, २३ जून रोजी पुन्हा एकदा गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाला आहे. नीट-यूजी २०२६ पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सरकारने या ऍपवर सुमारे आठवडाभरासाठी तात्पुरती बंदी घातली होती. राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए)च्या विनंतीनुसार केंद्र सरकारने १६ जून ते २२ जूनदरम्यान टेलिग्रामवर तात्पुरती बंदी लागू केली होती. नीट-यूजी २०२६ पुनर्परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांची दिशाभूल करण्यासाठी संघटित कॉपी प्रकरणांमध्ये सहभागी असलेले गट या प्लॅटफॉर्मचा वापर करत असल्याचा आरोप सरकारी यंत्रणांनी केला होता.

माहितीनुसार, टेलिग्राम ऍप पुन्हा प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले असले तरी त्यावरील ‘एडिट मेसेज’ हे फीचर ३० जूनपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, ऍप अद्याप ऍपलच्या ऍप स्टोअरवर उपलब्ध झालेले नाही. गेल्या आठवड्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने खबरदारीचा उपाय म्हणून भारतात टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. नीट पुनर्परीक्षेपूर्वी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. एनटीएने सांगितले की, २१ जून रोजी झालेल्या नीट-यूजी २०२६ पुनर्परीक्षेदरम्यान फसवणूक करणाऱ्या रॅकेट्सकडून टेलिग्रामचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली.

हे ही वाचा:

एआयमुळे ओरॅकलने काढले वर्षभरात २१ हजार कर्मचारी

पाकिस्तानविरोधी आंदोलनासाठी पीओकेमध्ये शाळकरी मुले, महिला रस्त्यावर

कतारमधील भारतीयांच्या मृत्यूवर जयशंकर यांनी व्यक्त केला शोक

अरूप रॉय तृणमूलच्या अध्यक्षपदी; बंडखोर गटाचा दावा

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयानेही केंद्र सरकारच्या निर्णयाला दुजोरा दिला आहे. टेलिग्राम एफझेड एलएलसीने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशाविरोधात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या एकल खंडपीठाने नीट-यूजी २०२६ पुनर्परीक्षेच्या संवेदनशील पार्श्वभूमीवर २२ जूनपर्यंत टेलिग्राम सेवा बंद ठेवणे आणि त्याचे ‘मेसेज एडिटिंग’ फीचर ३० जूनपर्यंत स्थगित ठेवणे हा योग्य निर्णय असल्याचे नमूद केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
316,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा