28.9 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरराजकारणमंत्रालयात इंटर्नशिपची सुवर्णसंधी

मंत्रालयात इंटर्नशिपची सुवर्णसंधी

कायद्याच्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्यक्ष कामाचा अनुभव

Google News Follow

राज्यातील कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा आणि भविष्याला दिशा देणारा उपक्रम सुरू केला आहे. आता विधी शाखेतील विद्यार्थ्यांना मंत्रालयातील विधी व न्याय विभागामध्ये इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता शासनाच्या विधी प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.

या इंटर्नशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विधेयके, अध्यादेश, नियम, शासन निर्णय, अधिसूचना तयार करण्याची प्रक्रिया समजून घेण्याची संधी मिळेल. तसेच कायदेशीर संशोधन, विविध न्यायालयीन निर्णयांचा अभ्यास, कागदपत्रांची छाननी आणि विधी विषयक विश्लेषण अशा महत्त्वाच्या कामांमध्येही त्यांचा सहभाग असेल. वरिष्ठ विधी अधिकारी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाचा अनुभव दिला जाणार आहे.
हे ही वाचा:
कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन घेतले मागे…

भातसा धरण तुडुंब; पाचही दरवाजे उघडले

नाशिककरांसाठी हक्काच्या घराची मोठी संधी

८वा वेतन आयोग : पगार आणि पेन्शनवाढीच्या चर्चांना वेग

इंटर्नशिपचा कालावधी सहा आठवड्यांचा असून, राज्यातील मान्यताप्राप्त विधी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे पात्र विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतील. विद्यार्थ्यांची निवड शैक्षणिक गुणवत्ता आणि निश्चित निकषांच्या आधारे केली जाईल. इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.

विधी शिक्षण अधिक व्यावहारिक आणि कौशल्याधारित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. न्यायव्यवस्था, शासकीय विधी सेवा किंवा वकिली क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंत्रालयात काम करण्याचा अनुभव निश्चितच मोठी संधी ठरणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल, तसेच शासनाच्या कायदे निर्मिती आणि निर्णय प्रक्रियेची सखोल माहिती त्यांना प्रत्यक्ष कामातून मिळणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा