28.2 C
Mumbai
Saturday, July 25, 2026
घरक्राईमनामाबिझनेस कन्सल्टंटवर ताज हॉटेलमध्ये बलात्कार करणारा बडा उद्योगपती अटकेत

बिझनेस कन्सल्टंटवर ताज हॉटेलमध्ये बलात्कार करणारा बडा उद्योगपती अटकेत

मुंबई विमानतळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Google News Follow

Related

मुंबई विमानतळ पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत अहमदाबादमधील एका बड्या उद्योगपतीला बेड्या ठोकल्या आहेत. निलेय जसभाई पटेल (४५) असे या आरोपीचे नाव असून, ताज हॉटेलमध्ये एका बिझनेस कन्सल्टंट महिला व्यावसायिकावर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. पीडित महिला व्यवसायाने बिझनेस कन्सल्टंट असून, आरोपी आणि तिच्यामध्ये व्यावसायिक बैठकीचे नियोजन ठरले होते.

या नियोजित बैठकीसाठी २० जुलै रोजी पीडिता हॉटेलमध्ये आली होती. २१ आणि २२ जुलैच्या दरम्यान हॉटेलमध्ये आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि घटनेनंतर तो पसार झाला. पीडितेच्या तक्रारीवरून २३ जुलै रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कसून शोध घेत पोलिसांनी २४ जुलैच्या मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास विमानतळावरूनच पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या.

हे ही वाचा:

कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन घेतले मागे…

ITR भरण्यासाठी अवघे सहा दिवस

मंत्रालयात इंटर्नशिपची सुवर्णसंधी

अनाहत सिंह इतिहास रचण्यापासून अवघे एक पाऊल दूर

आरोपी निलेय पटेलविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६४, ७४, ७५(२), ७६ आणि ३३३ नुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये बलात्कार, विनयभंग, पाठलाग करणे, अनुचित दबाव टाकणे आणि गंभीर दुखापत पोहोचवणे यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून कसली तपासणी सुरू केली असून, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज, पीडितेचा जबाब आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. घटनेचा सखोल तपास केला जात असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
322,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा