27.9 C
Mumbai
Thursday, July 30, 2026
घरक्राईमनामाखाण व्यावसायिकाच्या नातेवाईकाकडून २८ कोटींची रोकड, १५ किलो सोने जप्त

खाण व्यावसायिकाच्या नातेवाईकाकडून २८ कोटींची रोकड, १५ किलो सोने जप्त

पश्चिम बंगालमध्ये पोलिसांची मोठी कारवाई

Google News Follow

Related

पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात सुमारे २४ तास चाललेल्या छापेमारी, झडती आणि चौकशीनंतर पोलिसांनी गुरुवारी (३० जुलै) दगड खाण व्यावसायिक तुलू मंडलचा नातेवाईक मीनार मंडल याला अटक केली. या कारवाईत त्याच्या घरातून तब्बल २८ कोटी रुपयांहून अधिक रोकड आणि १५ किलो सोने जप्त करण्यात आले. बुधवारी दुपारी सुरू झालेल्या या कारवाईदरम्यान पोलिसांना मीनार मंडलच्या घरात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. इतक्या मोठ्या रकमेची मोजणी करण्यासाठी पोलिसांना स्थानिक बँकेकडून चलन मोजण्याची यंत्रे मागवावी लागली.

गुरुवारी सकाळी रोकडची दोनदा मोजणी पूर्ण झाल्यानंतर तपास पथकातील एका अधिकाऱ्याने जप्त करण्यात आलेली रोकड २८ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले. याशिवाय मीनार मंडलच्या घरातून १५ किलो सोनेही जप्त करण्यात आले असून त्याची बाजारातील अंदाजे किंमत २१ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या रोकड आणि सोन्याची एकूण किंमत जवळपास ५० कोटी रुपये इतकी असल्याचा अंदाज आहे.

गुरुवारी सकाळी मीनार मंडलला औपचारिक अटक करून स्थानिक पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्याचवेळी पोलिसांनी रोकड आणि सोन्याने भरलेल्या दोन ट्रंकही ताब्यात घेतल्या. त्याला नंतर सूरी येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे. सुरुवातीला इतक्या मोठ्या प्रमाणातील रोकड आणि सोन्याचा स्रोत काय, याबाबत मीनार मंडलने पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास नकार दिला. मात्र, नंतर त्याने ही रोकड आणि सोने एका संघटित गुन्हेगारी रॅकेटशी संबंधित असल्याची कबुली दिली. बीरभूमचे पोलिस अधीक्षक विदित राज बुंदेश यांनी या माहितीला दुजोरा दिला.

माहितीनुसार, मंगळवारी मोहम्मद बाजार पोलिस ठाण्याने सात दरोडेखोरांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास अधिकाऱ्यांना मीनार मंडलच्या घरात मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बुधवारी दुपारपासून सुरू झालेली छापेमारी गुरुवारी सकाळपर्यंत सुरू होती.

हे ही वाचा:

“कर्तव्य निडरपणे बजावा, जबाबदारी माझी” CRPF महासंचालक जवानांच्या पाठीशी

ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर विजयाचा शिल्पकार अजिंक्य रहाणे निवृत्त

पौराणिक महाकाव्याचा भव्य अविष्कार; ‘रामायण’चा ट्रेलर प्रदर्शित

ऍपल वॉच ठरलं ‘लाईफगार्ड’; मालक बेशुद्ध होताच स्वतःहून केला ९११ ला फोन

मीनार मंडल हा राज्य परिवहन महामंडळात बसचालक म्हणून कार्यरत होता. मात्र, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार तो तुलू मंडलच्या दगड खाण व्यवसायात मोठ्या प्रमाणात सहभागी होता. तुलू मंडल हा बीरभूममधील तृणमूल काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अनुव्रत मंडल यांचा निकटवर्तीय मानला जातो. मीनार मंडलच्या घरातून एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने जप्त झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून त्याचे शेजारीही आश्चर्य व्यक्त करत आहेत. यापूर्वीही तुलू मंडलवर बेकायदा दगड उत्खननाचे आरोप झाले होते. या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम बंगाल पोलीस करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा