28.6 C
Mumbai
Thursday, July 30, 2026
घरविशेषऍपल वॉच ठरलं ‘लाईफगार्ड’; मालक बेशुद्ध होताच स्वतःहून केला ९११ ला फोन

ऍपल वॉच ठरलं ‘लाईफगार्ड’; मालक बेशुद्ध होताच स्वतःहून केला ९११ ला फोन

ऍपल वॉचच्या सतर्कतेमुळे वाचला व्यक्तीचा जीव

Google News Follow

Related

स्मार्टवॉच हे केवळ फिटनेसचे मोजमाप करणारे किंवा वेळ दाखवणारे उपकरण नसून, प्रसंगी जीव वाचवणारे साधनही ठरू शकते, याचा प्रत्यय अमेरिकेत आला आहे. अमेरिकेतील ओहायो राज्यातील रहिवासी मोहम्मद इस्लाम यांनी दावा केला आहे की, घराबाहेर अचानक बेशुद्ध पडल्यावर त्यांच्या ऍपल वॉच ने आपोआप आपत्कालीन सेवेला (९११) कॉल केला. त्यामुळे काही मिनिटांतच वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले आणि वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला.

स्थानिक वृत्तवाहिनी WKRC ला दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी सकाळपासूनच मोहम्मद इस्लाम यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, कानाजवळ वेदना जाणवत होत्या आणि चालतानाही अडचण येत होती. त्यामुळे त्यांनी कामावर सुट्टी घेतली होती. काही वेळाने घराबाहेर कचरा टाकण्यासाठी गेल्यानंतर ते अचानक कोसळले आणि बेशुद्ध झाले. त्या वेळी ते घरी एकटेच असल्याने मदतीसाठी कोणीही जवळ नव्हते.

शुद्धीवर आल्यानंतर आपण जमिनीवर पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झाले नाही. काही वेळाने सायरनचा आवाज ऐकू आला. त्यानंतर त्यांना समजले की, त्यांच्या ऍपल वॉच मधील ‘फॉल डिटेक्शन’ या सुविधेने आपोआप आपत्कालीन सेवेला कॉल केला होता. काही मिनिटांतच वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या फुफ्फुसांमध्ये रक्ताच्या गाठी असल्याचे निदान केले. वेळेत उपचार मिळाले नसते, तर परिस्थिती गंभीर होऊ शकली असती, असे डॉक्टरांनी सांगितले. इस्लाम म्हणाले, “मी आज जिवंत आहे, याचे श्रेय ऍपल वॉच ला जाते. घड्याळाने आपोआप आपत्कालीन सेवेला फोन केला नसता आणि वैद्यकीय पथक वेळेत आले नसते, तर काय झाले असते याची कल्पनाही करता येत नाही.”

ऍपल वॉच मधील ‘फॉल डिटेक्शन’ हे वैशिष्ट्य वापरकर्ता जोरात पडल्याचे ओळखते. घड्याळाला पडल्याचा संशय आल्यास ते प्रथम मनगटावर कंपन करते, अलार्म वाजवते आणि वापरकर्ता सुरक्षित आहे का, असा संदेश स्क्रीनवर दाखवते. वापरकर्ता प्रतिसाद देऊ शकत असल्यास तो स्वतः परिस्थिती स्पष्ट करू शकतो. मात्र, सुमारे एक मिनिट कोणतीही हालचाल आढळली नाही, तर घड्याळ ३० सेकंदांची उलटी गणना सुरू करते. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास ते आपोआप स्थानिक आपत्कालीन सेवेला कॉल करते, वापरकर्त्याचे अचूक स्थान पाठवते आणि नोंदणीकृत आपत्कालीन संपर्कांनाही संदेश पाठवते.

हे ही वाचा:

‘पाकिस्तानी काश्मीर’ नव्हे, पाकिस्तानव्याप्त काश्मीर!

ट्रम्प-झेलेन्स्की भेटीनंतर रशियाचा कीव्हवर क्षेपणास्त्र हल्ला

जॉर्डनमधील हल्ल्यानंतर अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले

पेपरफुटीविरोधी कायदा लोकसभेत मंजूर

ही सुविधा ऍपल वॉच Series 4 आणि त्यानंतरच्या सर्व मॉडेल्स, ऍपल वॉच SE तसेच ऍपल वॉच Ultra मध्ये उपलब्ध आहे. ५५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या वापरकर्त्यांसाठी हे वैशिष्ट्य पूर्वनियोजितपणे सुरू असते. इतर वापरकर्ते आयफोनमधील Watch ऍपमधील Emergency SOS पर्यायातून ते सुरू करू शकतात. या घटनेमुळे वेअरेबल तंत्रज्ञान केवळ आरोग्याचे निरीक्षण करण्यापुरते मर्यादित नसून, आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावू शकते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
324,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा