27.7 C
Mumbai
Saturday, August 1, 2026
घरबिजनेसफेडच्या निर्णयानंतर सोन्याला झळाळी; चांदीत मात्र घसरण

फेडच्या निर्णयानंतर सोन्याला झळाळी; चांदीत मात्र घसरण

गुंतवणूकदारांची वाढली उत्सुकता

Google News Follow

Related

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सलग पाचव्यांदा व्याजदरात कोणताही बदल न करता ते स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर जागतिक सराफा बाजारात संमिश्र चित्र पाहायला मिळाले. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढल्याने मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर सोन्याच्या किमतींना आधार मिळाला. गुरुवारी सकाळच्या व्यवहारात ऑक्टोबर डिलिव्हरीचे सोने १० ग्रॅममागे सुमारे १.४१ लाख रुपयांच्या जवळ व्यवहार करत होते. त्याउलट चांदीच्या दरात घसरण झाली असून सप्टेंबर डिलिव्हरीची चांदी किलोमागे सुमारे २.१६ लाख रुपयांवर आली.

फेडच्या निर्णयानंतर अमेरिकन डॉलर आणि बाँड उत्पन्नात झालेल्या हालचालींचा थेट परिणाम मौल्यवान धातूंवर दिसून आला. व्याजदर स्थिर राहिल्याने भविष्यात दरकपातीच्या शक्यतांकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र औद्योगिक मागणीतील अनिश्चितता आणि नफावसुलीमुळे चांदीच्या किमतींवर दबाव कायम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हे ही वाचा:
व्याजदर स्थिर, पण धोक्याची घंटा कायम!

जंतर-मंतर आंदोलन प्रकरणी बलप्रयोगाचे निकष स्पष्ट करण्याचे निर्देश

खाण व्यावसायिकाच्या नातेवाईकाकडून २८ कोटींची रोकड, १५ किलो सोने जप्त

ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर विजयाचा शिल्पकार अजिंक्य रहाणे निवृत्त

आता गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेतील आगामी आर्थिक आकडेवारी, महागाईचा दर आणि फेडच्या पुढील बैठकीकडे लागले आहे. या घडामोडींवरच सोन्या-चांदीच्या किमतींची पुढील दिशा अवलंबून राहणार असल्याने बाजारात अल्पकालीन चढ-उतार कायम राहू शकतात. त्यामुळे मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करताना सावध भूमिका घेण्याचा सल्ला बाजार तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा