27.5 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरस्पोर्ट्सप्रीतीनंतर जॅस्मिनचीही सुवर्ण मुसंडी

प्रीतीनंतर जॅस्मिनचीही सुवर्ण मुसंडी

Google News Follow

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (सीडब्ल्यूजी) २०२६ मध्ये भारतीय महिला बॉक्सरांनी शनिवारी अवघ्या ३० मिनिटांत दोन सुवर्णपदके जिंकत देशाचा अभिमान उंचावला. प्रीती पवार हिने महिलांच्या ५४ किलो गटात, तर जॅस्मिन लंबोरिया हिने ५७ किलो गटात एकतर्फी विजय मिळवत भारताच्या पदकसंचयात सुवर्णाची भर घातली.

एसईसी हॉल-५ येथे झालेल्या अंतिम सामन्यात प्रीती पवारने कॅनडाच्या स्कार्लेट सवाना डेलगाडो हिचा ५-० अशा फरकाने पराभव केला. सामन्याच्या तिन्ही फेऱ्यांमध्ये प्रीतीने वर्चस्व राखत सर्व पंचांकडून सर्वोच्च गुण मिळवले आणि सुवर्णपदकावर नाव कोरले.

या स्पर्धेत प्रीतीने ‘राऊंड ऑफ १६’मध्ये मलावीच्या डेबोरा म्टेंजे हिला रेफरी स्टॉप कॉन्टेस्ट (आरएससी) ने पराभूत केले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत नॉर्दर्न आयर्लंडच्या निकोल क्लाइड हिच्यावर ५-०, उपांत्य फेरीत झांबियाच्या कॅथरीन म्वापे हिच्यावर ५-०, तर अंतिम फेरीतही ५-० अशा फरकाने विजय मिळवत सुवर्ण पटकावले.

यानंतर महिलांच्या ५७ किलो गटाच्या अंतिम सामन्यात जॅस्मिन लंबोरिया हिने नॉर्दर्न आयर्लंडच्या मायकेला वॉल्श हिला ५-० ने नमवले. पहिली फेरी ३-२ अशी जॅस्मिनच्या बाजूने राहिली. दुसऱ्या फेरीत तिने पूर्ण वर्चस्व गाजवले, तर तिसरी फेरी ४-१ ने जिंकत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले.

जॅस्मिनने उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडच्या एलिस ग्लिन हिला ४-१, तर उपांत्य फेरीत लेसोथोच्या रापेलांग मासेलेला हिला ५-० ने पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती.

या दोन सुवर्णपदकांमुळे भारताची पदकसंख्या २५ वर पोहोचली असून त्यात ७ सुवर्ण, १२ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत सध्या पदकतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा