28 C
Mumbai
Monday, August 3, 2026
घरराजकारणउद्धव ठाकरेंना अभिजित दीपकेच्या लग्नाची काळजी!

उद्धव ठाकरेंना अभिजित दीपकेच्या लग्नाची काळजी!

Google News Follow

Related

दिल्लीतल्या जंतर मंतर येथे झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर अभिजित दीपके प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यानंतर लगेच त्याच्या लग्नाची चौकशी सुरू झाली. त्याच्या आईवडिलांना प्रसारमाध्यमांनी दीपकेच्या लग्नाबद्दल विचारणा केली.
आता केवळ मीडियाच नव्हे तर नेतेही दीपकेच्या लग्नाच्या काळजीने त्रस्त झाले आहेत. दिल्लीतले आंदोलन संपल्यानंतर दीपके आपल्या संभाजीनगरच्या घरी आला. तेव्हा त्याला भेटण्यासाठी विविध पक्षांचे नेते तिथे येऊ लागले आहेत. संभाजीनगरमधील शिवसेना उबाठाचे नेते चंद्रकांत खैरेही त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले. तेव्हा त्यांनी दीपकेच्या आईवडिलांशी उद्धव ठाकरेंचा संपर्क करून दिला.
हे ही वाचा:
तेव्हा उद्धव ठाकरेंनी अभिजितच्या लग्नाबद्दल त्याच्या आईला विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या की, तोच आता ठरवेल. घरात सून यावी अशी कोणत्या आईवडिलांची अपेक्षा नसेल. पण हे त्याच्या मनावर असेल. मला बाळासाहेब ठाकरे खूप आवडत होते. उद्धव ठाकरेही आवडतात आणि आदित्य ठाकरेही. यावेळी शेजारी बसलेला अभिजित दीपकेही लाजला.
यासंदर्भातील व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यात आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे या आपल्या मुलांच्या लग्नाचे कधी बघणार, अशी मिश्किल टिप्पणी अनेकांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाबद्दल व यशाबद्दल दिपके कुटुंबीयांचे अभिनंदन केले. तसेच संपूर्ण विरोधक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

 

दीपके कुटुंबाला ‘मातोश्री’चे निमंत्रण

उद्धव ठाकरेंनी अभिजित दीपके आणि त्यांच्या कुटुंबियांना मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी येण्याचे निमंत्रणही दिले. अभिजित दिपके यांच्या दिल्लीतील आंदोलनाच्या यशस्वी समाप्तीनंतर छत्रपती संभाजीनगरमधील त्यांच्या घरी विविध राजकीय नेत्यांनी सदिच्छा भेट दिली.चंद्रकांत खैरे यांच्यासह मंत्री संजय शिरसाट आणि आमदार बच्चू कडू यांनीही दिपके कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा