28.2 C
Mumbai
Sunday, August 2, 2026
घरस्पोर्ट्सभालाफेकीत भारताची दुहेरी कमाल!

भालाफेकीत भारताची दुहेरी कमाल!

नीरजचे रौप्य, यशवीरचे कांस्य; भारताचा गौरव वाढवला

Google News Follow

Related

कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताच्या भालाफेकपटूंनी शानदार कामगिरी करत देशाच्या पदकतालिकेत आणखी दोन पदकांची भर घातली. ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्राने ८५.८३ मीटर भालाफेक करत रौप्यपदक पटकावले, तर यशवीर सिंहने ८५.४१ मीटर अंतर गाठत कांस्यपदक आपल्या नावावर केले. श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पथिराजाने ८९.७५ मीटर भालाफेक करून सुवर्णपदकावर कब्जा केला.

नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८०.९७ मीटर भालाफेक केली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ८५.८३ मीटर अंतर गाठत हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नात त्याने अनुक्रमे ८१.२९ मीटर आणि ८०.७३ मीटर अंतर गाठले. मात्र, श्रीलंकेच्या पथिराजाच्या दमदार ८९.७५ मीटर फेकीमुळे नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

यशवीर सिंहनेही स्पर्धेत जबरदस्त पुनरागमन केले. दुसऱ्या प्रयत्नात त्याने ७८.५५ मीटर, तर तिसऱ्या प्रयत्नात ८१.३३ मीटर अंतर गाठले. पाचव्या प्रयत्नात ७६.९५ मीटर भालाफेक केल्यानंतर अखेरच्या आणि निर्णायक प्रयत्नात ८५.४१ मीटर अंतर गाठत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे ही त्याच्या कारकिर्दीतील वैयक्तिक सर्वोत्तम (Personal Best) कामगिरी ठरली.

भारताचा आणखी एक खेळाडू रोहित यादव याने ८१.५६ मीटर अंतरासह सातवे स्थान मिळवले.

या दुहेरी यशामुळे भारताच्या पदकसंख्येत भर पडली असून, कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताच्या खात्यात आता एकूण २३ पदके जमा झाली आहेत. यामध्ये ५ सुवर्ण, १२ रौप्य आणि ६ कांस्यपदकांचा समावेश आहे.

अॅथलेटिक्स आणि पॅरा-अॅथलेटिक्समध्ये भारताने आतापर्यंत ११ पदके जिंकली आहेत. याशिवाय जुडोमध्ये ३ पदके (२ सुवर्ण), वेटलिफ्टिंगमध्ये ८ पदके, तर पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये १ कांस्यपदक मिळाले आहे. भारत सध्या पदकतालिकेत दहाव्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया १२८ पदकांसह अव्वल, इंग्लंड ८० पदकांसह दुसऱ्या, तर कॅनडा ५३ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा