28.3 C
Mumbai
Sunday, August 9, 2026
घरक्राईमनामाबंगळुरूतील फाईव्ह स्टार हॉटेल्समधून सडलेले दूध, मांस जप्त

बंगळुरूतील फाईव्ह स्टार हॉटेल्समधून सडलेले दूध, मांस जप्त

३५ खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत, अनेक हॉटेल्सना नोटिसा

Google News Follow

Related

बंगळुरूमधील काही प्रसिद्ध थ्री-स्टार आणि फाइव्ह-स्टार हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकच्या अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने (Food Safety and Drug Administration Department) केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत कालबाह्य दूध, खराब मांस, बुरशी लागलेल्या भाज्या, कालबाह्य खाद्यपदार्थ आणि अस्वच्छ साठवणूक आढळून आली.

या कारवाईत बंगळुरूतील तब्बल २६ थ्री-स्टार आणि फाइव्ह-स्टार हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. शुक्रवारी, ७ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या सर्व झोनमध्ये ३० अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकांनी ही विशेष मोहीम राबवली. तपासणीदरम्यान विविध खाद्यपदार्थांचे ३५ नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना काही हॉटेल्सच्या स्वयंपाकघरांमध्ये आणि खाद्यपदार्थ साठवण्याच्या ठिकाणी गंभीर त्रुटी आढळल्या. यामध्ये कालबाह्य खाद्यपदार्थ, कालबाह्य दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, खराब मांस, मासे तसेच बुरशी लागलेल्या भाज्या यांचा समावेश आहे. काही ठिकाणी खाद्यपदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक केली जात नसल्याचेही आढळले. तसेच स्वयंपाकघरातील स्वच्छतेच्या स्थितीबाबतही अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला.

विशेष म्हणजे काही हॉटेल्समध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ स्वतंत्रपणे ठेवले जात नसल्याचे समोर आले. खाद्यपदार्थांच्या लेबलिंगमध्ये त्रुटी, चुकीचे लेबल लावणे आणि खाद्यपदार्थांचे चुकीचे ब्रँडिंग अर्थात ‘मिसब्रँडिंग’ केल्याचेही आढळले. काही ठिकाणी Food Safety and Standards Authority of India (FSSAI) च्या अनिवार्य लेबलिंग नियमांचे पालन झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

हे ही वाचा:

चीनच्या ‘मॅप वॉर’ला भारताचे प्रत्युत्तर; अरुणाचलमधील २७ ठिकाणांना अधिकृत ओळख

नाक खुपसू नका! ‘एफसीआरए’ भारताचा अंतर्गत विषय!!

भारताकडे येणाऱ्या ६२ जहाजांनी सुरक्षितपणे ओलांडली होर्मुझ

परकीय निधी विनियमन कायद्याने ख्रिश्चनांचा छळ, ही थाप!

तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळलेल्या हॉटेल्सना विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रयोगशाळेतील अहवाल आणि लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास संबंधित खाद्य व्यवसाय चालकांविरोधात कायद्यानुसार कारवाई होऊ शकते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
326,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा