32.1 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरदेश दुनियारशियन तेल रिफायनरी, लष्करी तळांना युक्रेनकडून लक्ष्य

रशियन तेल रिफायनरी, लष्करी तळांना युक्रेनकडून लक्ष्य

लांब पल्ल्याचे हल्ले सुरूच

Google News Follow

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाविरोधात लांब पल्ल्याचे हल्ले सुरूच ठेवणार असल्याचे म्हटले आहे. गुरुवारी रात्री करण्यात आलेल्या युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमध्ये रशियातील पर्म तेल रिफायनरी, मारीनोव्हका लष्करी हवाई तळ आणि इतर लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केला.

झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर म्हटले की, “युद्धाचे परिणाम जिथून सुरू झाले, तिथेच परत पोहोचवण्यासाठी आम्ही लांब पल्ल्याच्या हल्ल्यांची आणि प्रत्युत्तराची रणनीती सुरू ठेवत आहोत.” गुरुवारी रात्रीच्या हल्ल्यांमध्ये सीमेपासून १,६०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर असलेल्या पर्म तेल रिफायनरीला तसेच रशियाच्या वोल्गोग्राड भागातील मारीनोव्हका लष्करी हवाई तळाला लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. काळ्या समुद्राच्या परिसरातही युक्रेनला काही यश मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

याआधी केलेल्या हल्ल्यांचेही काही परिणाम निश्चित झाल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले. अख्तुबिन्स्क हवाई तळावर रशियाचे एसयू-३४ लढाऊ विमान नुकसानग्रस्त झाल्याचा दावा त्यांनी केला. हा हवाई तळ आघाडीच्या युद्धक्षेत्रापासून सुमारे ६०० किलोमीटर अंतरावर आहे.

याशिवाय, सुमारे १८० किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रिमोर्स्को-अख्तार्स्क येथे हल्लेखोर ड्रोनच्या साठवणुकीसाठी, तयारीसाठी आणि प्रक्षेपणासाठी असलेल्या केंद्राला लक्ष्य करण्यात आल्याचेही झेलेन्स्की यांनी सांगितले. रशिया याच ड्रोनचा वापर युक्रेनमधील नागरिकांवर हल्ले करण्यासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

हे ही वाचा:

एफडीधारकांसाठी मोठी बातमी! आता व्याजदराची माहिती रोज मिळणार

भारत-मॉरिशसदरम्यान ५ वर्षांचा मोठा इंधन करार

ब्रिटन-युरोपच्या गुंतवणुकीला भारताचा ‘ग्रीन चॅनेल’

अभ्यास न केल्याने शिक्षिकेने थप्पड मारली; ६ वर्षांचा मुलगा तिथेच गतप्राण

दरम्यान, रशियाकडून युक्रेनवरील हल्ले सुरूच असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. बुधवारी रात्री रशियाने युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात हल्ले केले. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा एकाच वेळी वापर करून नागरी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. कीव आणि आसपासचा परिसर, तसेच ओडेसा आणि चेर्निहीव्ह भागात मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा