27.8 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरदेश दुनियासौदी अरेबियाजवळ तेलवाहू टँकरवर हल्ला; जहाजाच्या डेकवर आग

सौदी अरेबियाजवळ तेलवाहू टँकरवर हल्ला; जहाजाच्या डेकवर आग

सर्व कर्मचारी सुरक्षित

Google News Follow

सौदी अरेबियातील यानबूपासून सुमारे ६३ नॉटिकल मैल (११७ किमी) पश्चिमेला एका तेलवाहू टँकरवर ‘अज्ञात क्षेपणास्त्रासदृश वस्तूने’ (unknown projectile) हल्ला झाल्याची माहिती यूके मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) ने सोमवारी दिली. या हल्ल्यानंतर जहाजाच्या मुख्य डेकवर आग लागली.

जहाजाच्या कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणीही बेपत्ता नाही. ब्रिटिश समुद्री सुरक्षा कंपनी वॅनगार्ड टेकनेही सौदी ध्वज असलेल्या एका जहाजावर क्षेपणास्त्राने हल्ला झाल्याचे सांगितले. या हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली. यानबू हा सौदी अरेबियाचा प्रमुख तेल बंदर असून, येथून दररोज लाखो बॅरल तेलाची निर्यात केली जाते. होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदीनंतर सौदी तेल निर्यातीसाठी यानबू हा महत्त्वाचा मार्ग बनला आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात इराणसमर्थित येमेनमधील हूती बंडखोरांनी लाल समुद्रात सौदीशी संबंधित जहाजांची नाकेबंदी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर यानबू येथून होणाऱ्या जहाज वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. या भागात अलीकडे झालेल्या अनेक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. यापूर्वी १७ ऑगस्ट रोजी हूती बंडखोरांनी लाल समुद्रात मोचा बंदराजवळ सौदी लष्कराच्या एका लँडिंग जहाजावर आणि त्याच्यासोबत असलेल्या चार एस्कॉर्ट जहाजांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा केला होता.

हे ही वाचा:

काश्मिरी पंडितांची नाव-पत्त्यासह नंबर असलेली यादी दहशतवाद्यांकडून जारी

३० हजार कोटींच्या ‘डिजिटल अरेस्ट’ रॅकेटप्रकरणी मुंबईत दोघांना अटक

वंधामातील २३ काश्मिरी पंडितांच्या हत्येचे गूढ उलगडणार?

बलुचिस्तानात पाक सैन्यावर हल्ला; १३ ठार

हूती लष्कराचा प्रवक्ता याह्या सरी यांनी या हल्ल्यात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आल्याचे सांगितले होते. त्यांच्या दाव्यानुसार, लँडिंग जहाजाला आग लागली, तर काही एस्कॉर्ट जहाजे बुडाली आणि इतर जहाजांनाही आग लागली. मोचा हे बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीजवळील धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे बंदर शहर आहे. ही सामुद्रधुनी लाल समुद्राला एडनच्या आखाताशी जोडते. त्यामुळे हा परिसर जागतिक सागरी व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक मानला जातो.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा