28.8 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरदेश दुनियानेपाळवर पुन्हा महापुराचे संकट; चीनचा गंभीर इशारा

नेपाळवर पुन्हा महापुराचे संकट; चीनचा गंभीर इशारा

सीमेवरील ‘बॅरियर लेक’ धोकादायक पातळीवर

Google News Follow

नेपाळ-चीन सीमेवर बुधवारी आलेल्या भीषण महापुराच्या जखमा ताज्या असतानाच आता नेपाळसमोर पुन्हा एका मोठ्या पुराचा धोका निर्माण झाला आहे. चीनने नेपाळला गंभीर इशारा देत, सीमेपलीकडे तयार झालेल्या एका नव्या ‘बॅरियर लेक’मुळे पुढील तीन दिवसांत पुन्हा मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह खाली येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या तलावात पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून, त्याचा नैसर्गिक अडथळा तुटल्यास अचानक मोठा पूर येऊ शकतो.

चीनच्या जलसंपदा मंत्रालयाच्या माहितीनुसार, छोचेन खोला आणि प्युरेपु त्सांगपो नद्यांच्या संगमाजवळ हा बॅरियर लेक तयार झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत या तलावात सुमारे २० लाख घनमीटर पाणी साचले होते आणि त्यातून पाण्याचा ओव्हरफ्लो सुरू झाला आहे. पुढील तीन दिवसांत आणखी सुमारे ३० लाख घनमीटर पाणी या तलावात येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तलावाचा नैसर्गिक अडथळा फुटण्याचा धोका वाढला आहे. संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी चीनकडून पूरस्थितीचे सिम्युलेशन करण्यात येत असून, आपत्कालीन बचाव यंत्रणांनाही सज्ज ठेवण्यात आले आहे.
हे ही वाचा:
सहवाग-द्रविड़ यांच्या मुलांची भारताच्या अंडर-१९ संघात निवड

S-400चा शोध घेण्यासाठी पाकने सक्रीय केलेले गुप्तहेर-स्लीपर सेल

मुलीला नैनीकडे सोडून आई परदेशात गेली; कोर्टाने ठोठावला २० लाखांचा दंड

लालबाग परळ भागात जिहादींचा उच्छाद

हा इशारा अशा वेळी आला आहे, जेव्हा २६ ऑगस्ट रोजी हिमनदीचा मोठा भाग कोसळल्यानंतर नेपाळच्या भोटेकोशी नदीत अचानक महापूर आला. हिमनदीतील बर्फ आणि दगडांचा प्रचंड ढिगारा नदीच्या प्रवाहात कोसळल्याने काही काळ नैसर्गिक धरणासारखी स्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर मोठ्या वेगाने पाण्याचा लोंढा खाली आला. रासुवा, नुवाकोट, धादिंग, गोर्खा आणि चितवन या भागांमध्ये या पुराचा मोठा फटका बसला.

या पुराच्या पार्श्वभूमीवर चीनच्या तिबेट भागातील जिरॉन्ग बंदराजवळही मोठी दरड कोसळली. चिखल आणि दगडांमुळे रस्ते तसेच संपर्क व्यवस्था विस्कळीत झाली असून, चीनच्या बाजूला शेकडो लोक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेचा आणि नेपाळमधील पुराचा थेट संबंध आहे की नाही, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, नेपाळ प्रशासनाने भोटेकोशी, त्रिशूली आणि नारायणी नदीच्या काठावरील नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत नदीकाठापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. बचावकार्य सुरू असतानाच पुन्हा पुराचा धोका निर्माण झाल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. हिमालयीन भागात अशा अचानक येणाऱ्या पुरांची वारंवारता वाढत असल्याने भविष्यातही अशा संकटांचा धोका कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा