27.9 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरदेश दुनियाकॅनडाला डिवचलं? ट्रम्प यांनी लेक ऑन्टारिओचं नाव केलं ‘लेक अमेरिका’

कॅनडाला डिवचलं? ट्रम्प यांनी लेक ऑन्टारिओचं नाव केलं ‘लेक अमेरिका’

ट्रम्प यांचा वादग्रस्त निर्णय

Google News Follow

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडासोबतचा व्यापारविवाद चिघळलेला असतानाच आणखी एक वादग्रस्त निर्णय घेतला आहे. अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर असलेल्या ‘लेक ऑन्टारिओ’ या प्रसिद्ध सरोवराचं नाव बदलून ‘लेक अमेरिका’ करण्याच्या आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील आधीच तणावपूर्ण असलेल्या संबंधांमध्ये आणखी कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेतील सर्व सरकारी यंत्रणा आणि अधिकृत नोंदींमध्ये या सरोवरासाठी ‘लेक अमेरिका’ या नावाचा वापर केला जाणार आहे. मात्र, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या आदेशामुळे कॅनडा किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांना हे नाव स्वीकारणं बंधनकारक नाही. त्यामुळे कॅनडामध्ये या सरोवरासाठी ‘लेक ऑन्टारिओ’ हेच पारंपरिक नाव वापरलं जाण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांच्या या निर्णयाला कॅनडाकडून विरोध करण्यात आला आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी या नामकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. या सरोवराचं नाव कॅनडाच्या इतिहासाशी आणि स्थानिक आदिवासी संस्कृतीशी जोडलेलं असल्याने ते बदलण्याचा अमेरिकेचा निर्णय कॅनडा स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे एकाच सरोवरासाठी अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांकडून वेगवेगळी नावं वापरली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘लेक ऑन्टारिओ’चं नामकरण हा केवळ भौगोलिक बदल नसून, अमेरिका-कॅनडा व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवरचा राजकीय संदेश मानला जात आहे. दोन्ही देशांमध्ये गेल्या काही काळापासून आयात शुल्क आणि व्यापाराच्या मुद्द्यावरून संघर्ष सुरू आहे. अमेरिकेने कॅनडातून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर मोठं शुल्क लागू केलं आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून कॅनडानेही अमेरिकन वस्तूंवर शुल्क लावलं आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी सरोवराच्या नामकरणाचा निर्णय घेतल्याने त्याकडे राजकीय भूमिकेचा भाग म्हणून पाहिलं जात आहे.

हे ही वाचा:

नेपाळमध्ये महापुराचं थैमान; मृतांचा आकडा ४६९ वर

नेपाळवर पुन्हा महापुराचे संकट; चीनचा गंभीर इशारा

भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याची तिकीट विक्रीत धूम

सेहवाग-द्रविड़ यांच्या मुलांची भारताच्या अंडर-१९ संघात निवड

ट्रम्प प्रशासनाने यापूर्वीही अमेरिकेतील आणि अमेरिकेशी संबंधित भौगोलिक नावांमध्ये बदल करण्याचे निर्णय घेतले आहेत. ‘गल्फ ऑफ मेक्सिको’ या नावाऐवजी ‘गल्फ ऑफ अमेरिका’ हे नाव वापरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच अमेरिकेतील ‘डेनाली’ पर्वताचं नाव बदलून पुन्हा ‘माउंट मॅककिन्ली’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ‘लेक ऑन्टारिओ’चं नाव ‘लेक अमेरिका’ करण्याचा निर्णयही त्याच धोरणाचा भाग असल्याचं मानलं जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा