31 C
Mumbai
Friday, August 28, 2026
घरराजकारणफिर एक बार मोदी सरकार!

फिर एक बार मोदी सरकार!

‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षणात एनडीएला ३२६ जागांचा अंदाज

Google News Follow

Related

देशात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता असल्याचं ‘इंडिया टुडे-सीव्होटर मूड ऑफ द नेशन’च्या ताज्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या सर्वेक्षणानुसार एनडीएला ३२६ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, जानेवारी २०२६ मधील सर्वेक्षणाच्या तुलनेत एनडीएच्या संभाव्य जागांमध्ये २६ जागांची घट झाली आहे.

पक्षनिहाय आकडे पाहिल्यास भाजपला काहीसा धक्का बसताना दिसत आहे. ताज्या सर्वेक्षणात भाजपला २६१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. जानेवारीतील सर्वेक्षणात भाजपसाठी २८७ जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. म्हणजेच सहा महिन्यांत भाजपच्या संभाव्य जागांमध्ये २६ जागांची घट झाली आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या कामगिरीत मोठी सुधारणा झाल्याचं सर्वेक्षणातून दिसतं. काँग्रेसला १०६ जागा मिळण्याचा अंदाज असून, जानेवारीतील ८० जागांच्या अंदाजाच्या तुलनेत ही २६ जागांची वाढ आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीला एकूण १८५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. जानेवारीतील सर्वेक्षणात या आघाडीला १८२ जागांचा अंदाज होता.

मतांच्या टक्केवारीतही एनडीए आघाडीवर असल्याचं सर्वेक्षण सांगतं. एनडीएला ४५.१ टक्के मतं मिळण्याचा अंदाज असून, जानेवारीतील ४७ टक्क्यांच्या तुलनेत यात काहीशी घट झाली आहे. ‘इंडिया’ आघाडीला ३९.१ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. जानेवारीतील ३९ टक्क्यांच्या तुलनेत हा किरकोळ बदल आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला सुमारे ४४ टक्के मतं मिळाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अद्याप मजबूत असल्याचं सर्वेक्षणातून दिसत असलं, तरी त्यांच्या कामगिरीला मिळणाऱ्या पसंतीत घट झाली आहे. मोदींच्या कामगिरीला ५८ टक्के लोकांनी मान्यता दिली आहे. जानेवारी २०२६च्या सर्वेक्षणाच्या तुलनेत हा आकडा सहा टक्क्यांनी कमी झाला आहे. सर्वेक्षणात ५१ टक्के नागरिकांनी मोदींची कामगिरी चांगली असल्याचं म्हटलं, तर १७ टक्के लोकांनी ती सरासरी आणि २७ टक्के लोकांनी खराब असल्याचं मत व्यक्त केलं.

हे ही वाचा:

कॅनडाला डिवचलं? ट्रम्प यांनी लेक ऑन्टारिओचं नाव केलं ‘लेक अमेरिका’

नेपाळमध्ये महापुराचं थैमान; मृतांचा आकडा ४६९ वर

नेपाळवर पुन्हा महापुराचे संकट; चीनचा गंभीर इशारा

भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याची तिकीट विक्रीत धूम

सरकारच्या कामगिरीबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीमध्ये महागाई सर्वात मोठा मुद्दा ठरला आहे. २३ टक्के नागरिकांनी महागाईला सरकारचं सर्वात मोठं अपयश मानलं. त्यानंतर बेरोजगारीला १६ टक्के आणि आर्थिक विकासाला १४ टक्के लोकांनी सरकारच्या अपयशाशी जोडले. दुसरीकडे, सरकारची सर्वात मोठी कामगिरी म्हणून राजकीय स्थैर्याला १३ टक्के लोकांनी पसंती दिली. राम मंदिर आणि पायाभूत सुविधांना प्रत्येकी ११ टक्के लोकांनी सरकारच्या कामगिरीतील महत्त्वाचे मुद्दे मानलं.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा