28 C
Mumbai
Saturday, September 26, 2026
घरराजकारणसज्जन कुमार यांच्या घरी गेलेल्या भाजपच्या ३ खासदारांना फटकारले

सज्जन कुमार यांच्या घरी गेलेल्या भाजपच्या ३ खासदारांना फटकारले

नितीन नबीन यांनी खासदारांना सुनावले

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

सज्जन कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शोक व्यक्त करणाऱ्या भाजपच्या दिल्लीतील तीन खासदारांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी फटकारले आहे. कमलजीत सहरावत, रामवीर सिंह बिधुरी आणि योगेंद्र चंदोलिया यांनी सज्जन कुमार यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली होती. मात्र, १९८४ च्या शीखविरोधी दंगलींच्या पार्श्वभूमीवर या भेटीवर पक्षांतर्गत नाराजी व्यक्त करण्यात आली.

सज्जन कुमार हे १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील हत्येच्या प्रकरणात दोषी ठरले होते आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यांच्या निधनानंतर भाजपच्या तीन खासदारांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले. दंगलीतील पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या मुद्द्यावर भाजपने सातत्याने भूमिका घेतलेली असताना पक्षाच्या खासदारांनी दोषी ठरलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित झाला.
हे ही वाचा:
नेपाळमध्यल्या महापुरात आतापर्यंत ६२६ जणांचा मृत्यू; हजारो बेपत्ता

पाकिस्तानची फलंदाजी की गल्ली क्रिकेट!

पंतप्रधान मोदी उझबेकिस्तान – किर्गिस्तानच्या दौऱ्यावर

दलितांच्या अपमानावर राहुल गांधी आक्रमक

या प्रकरणावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित खासदारांना स्पष्ट शब्दांत समज दिली. दरम्यान, भाजपने या भेटीपासून अधिकृतपणे अंतर राखले आहे. पक्षाचे प्रवक्ते आर. पी. सिंह यांनी स्पष्ट केले की, तिन्ही खासदार पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नव्हे, तर वैयक्तिक क्षमतेत सज्जन कुमार यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे या भेटीचा पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी संबंध नसल्याचे भाजपने स्पष्ट केले.

या घटनेमुळे १९८४ च्या दंगलींचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. विशेषतः दंगलीतील पीडितांच्या न्यायासाठी भाजपने घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर तीन खासदारांची ही भेट पक्षासाठी अडचणीची ठरली आहे. एका बाजूला मानवी संवेदना आणि दुसऱ्या बाजूला १९८४ च्या दंगलींचा संवेदनशील इतिहास यामुळे या भेटीवरून भाजपमध्येच सावध भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा