31 C
Mumbai
Saturday, September 26, 2026
घरराजकारणराहुल गांधींचा नवा शोध... दलित, सवर्णांसाठी चहावाल्याकडे वेगवेगळे कप!

राहुल गांधींचा नवा शोध… दलित, सवर्णांसाठी चहावाल्याकडे वेगवेगळे कप!

एससी-एसटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्याची मागणी

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आता नवा विषय शोधला आहे. छात्रो की गूँजच्या माध्यमातून केलेले दावे फोल ठरल्यानंतर आता दलितांवर कसा अन्याय केला जातो, याचे अजब दावे राहुल गांधींनी केले.   दिल्लीतील इंदिरा भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी उत्तराखंडमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेच्या ठिकाणी करण्यात आलेल्या ‘शुद्धीकरणा’चा मुद्दा उपस्थित केला. पण दलितांवर भाजपा, आरएसएसकडून अन्याय केला जात असल्याचा शोध लावला.

राहुल गांधी यांनी दावा केला की, काही ठिकाणी दलित मुलांकडून झाडू मारणे किंवा स्वच्छतेची कामे करून घेतली जात आहेत. दलितांना अजूनही विहिरीतून पाणी पिऊ दिले जात नाही. चहाच्या दुकानांत कागदी आणि काचेच्या कपमधून चहा देताना भेदभाव केला जात असल्याचाही अजब दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, चहाच्या दुकानात कागदाच्या कपमधून दलितांना चहा देण्यात येतो तर काचेच्या ग्लासमधून सवर्ण चहा पितात.

हे ही वाचा:

फेडच्या व्याजदरवाढीच्या संकेतांनी सोन्या-चांदीला झटका

व्हेनेझुएलाच्या ६५ अब्ज बॅरलपेक्षा अधिक तेलसाठ्यावर अमेरिकेचे नियंत्रण

भारताच्या परकीय चलनसाठ्याचा विक्रम; ७२९ अब्ज डॉलरचा टप्पा पार

पती अमेरिकेत, पत्नी नेपाळमध्ये बेपत्ता; हेलावणारी कहाणी

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील सभेनंतर त्याच ठिकाणी ‘शुद्धीकरण’चा विधी करण्यात आल्याचा मुद्दा राहुल गांधी यांनी मांडला. त्यांच्या मते, एखादा दलित नेता देशातील सर्वोच्च राजकीय पदांपैकी एका पदावर असतानाही त्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाचे ‘शुद्धीकरण’ केले जात असेल, तर सामान्य दलित नागरिकांची परिस्थिती किती गंभीर असेल, हा प्रश्न उपस्थित होतो. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लोकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा