30 C
Mumbai
Thursday, September 24, 2026
घरराजकारणपाकिस्तानची कोती मनोवृत्ती, मोदींचा फोटोच हटवला!

पाकिस्तानची कोती मनोवृत्ती, मोदींचा फोटोच हटवला!

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

पाकिस्तानच्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन बिश्केक येथे झालेल्या परिषदेदरम्यान झाले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोच आपल्या सोशल मीडियातून हटवून केवळ आपला फोटो मध्यभागी दिसेल अशी व्यवस्था केली. जगभरातून पाकिस्तानचे त्यामुळे हसे झाले.

पाकिस्तानने आपल्या पंतप्रधान कार्यालयाच्या समाजमाध्यम खात्यावर एससीओ शिखर परिषदेतील नेत्यांचे समूह छायाचित्र प्रसिद्ध केले. मात्र या छायाचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन आणि इतर काही नेत्यांना कापून टाकण्यात आले. या छायाचित्राची रचना अशा पद्धतीने करण्यात आली होती की पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ मध्यभागी दिसावेत आणि ते अधिक महत्त्वाच्या स्थानावर असल्याचा आभास निर्माण व्हावा.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः प्रसिद्ध केलेल्या मूळ छायाचित्रात सर्व नेते स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामध्ये शाहबाज शरीफ हे उजवीकडून चौथ्या क्रमांकावर उभे असल्याचे दिसते. त्यामुळे मोदींनी तिथे कोणताही दुस्वास न करता सगळ्यांचे फोटो येतील याची काळजी घेतली. त्यातून भारत आणि पाकिस्तानच्या मनोवृत्तीतला फरक दिसून आला.

समाजमाध्यमांवर पाकिस्तानची खिल्ली

पाकिस्तानच्या या प्रकारानंतर समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. अनेक वापरकर्त्यांनी पाकिस्तानने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्राला अपरिपक्व प्रचारतंत्र असल्याचे म्हटले. काही वापरकर्त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या हातात ‘कटोरे’ दाखवणारी संपादित छायाचित्रेही प्रसिद्ध केली.

हे ही वाचा:

धावत्या ट्रेनमध्ये दिवा लावून देवाची पूजा

भावनगरच्या रेल्वेला मिळणार ‘बूस्टर’!

पुराच्या पाण्यातून वाहून आलेले मासे खाल्यांने बिहारमधील अनेक लोक आजारी

ओरॅकलमध्ये १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट

व्हिडिओतूनही मोदींना वगळले

प्रकरण केवळ समूह छायाचित्रापुरते मर्यादित राहिले नाही. शहबाज शरीफ यांच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यावर एससीओ नेत्यांच्या गोलमेज बैठकीचा एक व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाग कापण्यात आला होता. मात्र मूळ व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे पाकिस्तानच्या अधिकृत खात्यांकडून जाणीवपूर्वक संपादन करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली.

एससीओ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी संवाद साधला. तिघांनी हस्तांदोलन केले आणि काही वेळ चर्चा केली. दरम्यान, समूह छायाचित्रानंतर शहबाज शरीफ हे पुतीन यांच्याजवळ जाताना दिसले. पुतीन व्यासपीठावरून निघत असताना शरीफ यांनी त्यांचा हात धरून त्यांच्याशी संवाद साधला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा