32 C
Mumbai
Thursday, September 10, 2026
घरविशेषदिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Google News Follow

Related

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (२ सप्टेंबर) महत्त्वाचा निर्णय दिला आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे आणि तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचे निर्देश दिले आहेत.

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुलीच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा आणि एफआयआर नोंदवावी, अशी मागणी त्यांनी केली होती. २८ ऑगस्ट रोजी या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार, सीबीआयकडून सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यात येणार असून, त्यानंतर एफआयआर दाखल करून तपास सुरू केला जाणार आहे. तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील निलेश ओझा यांनी दिली आहे.

तसेच, मालवणी पोलिसांकडे असलेली या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे आणि तपासाची माहिती सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तपासादरम्यान पुराव्यांच्या आधारे ज्यांची नावे समोर येतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

मध्यपूर्वेतील युद्धाची धग शेअर बाजाराला; सेन्सेक्स ४७२ अंकांनी घसरला

तामिळनाडूतील ५२ मंदिरांमध्ये स्मार्टफोनला बंदी

५.५ टन औषधांसह बचाव पथक घेऊन पाचवे विमान नेपाळकडे रवाना

होर्मुझवर अमेरिकेचे जवळपास पूर्ण नियंत्रण!

यापूर्वी सरकारी पक्षाने दिशाच्या मृत्यूचा तपास करण्यात आला असून, दोन वेळा क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले होते. या अहवालांमध्ये कोणतेही संशयास्पद कारण आढळले नसल्याचा दावा सरकारी पक्षाने केला होता. दुसरीकडे, याचिकाकर्त्यांच्या वतीने तपासातील अनेक बाबींवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाल्याने दोन्ही प्रकरणे जोडून अनेक आरोप केले गेले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
332,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा